Home विदर्भ यवतमाळ मधील तारांकीन दर्जात्या हाॅटेल मधील पार्टी अन् अमोल कोमावार यांचे “आत्मदहन”...

यवतमाळ मधील तारांकीन दर्जात्या हाॅटेल मधील पार्टी अन् अमोल कोमावार यांचे “आत्मदहन” ……गुढ कायम…..!

1078

लवकरच “पञकार संरक्षण समिती” चे संस्थापक / अध्यक्ष विनोद पञे अमोल कोमावार यांना घेऊन मा. अजितजी पवार व मा. धनंजयभाऊ मुंडे यांची भेट घेणार

विनोद पञे

यवतमाळ –  वर्धा – यवतमाळ – नांदेड नवनिर्मित रेल्वे उत्खननातील गौनखनिज गैरप्रकारा संदर्भात संबंधित वरिष्ठांना अनेकदा पुराव्यानिशी तक्रारी दिल्या तसेच आमरण उपोषणही केले परंतु आजपर्यंत सुमारे दिड वर्षांपासून कंत्राटदार व दोषी अधिकार्यांवर कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे व अधिकाऱ्यांना हेतुपुरस्सर तक्रारदारालाच गोवण्याचा प्रयत्न करून दडपण्याचा सपाटा लावल्यामुळे त्याचबरोबर सततच्या धमक्या, बाचाबाची, हमले यामुळे तक्रार तक्रारदार व त्याचा संपूर्ण परीवार असुरक्षित झाल्यामुळे तक्रारदाराने “आत्मदहन”द्वारे संपूर्ण प्रकरण आणून दोषी अधिकारी व कंत्राटदाराला चांगलीच चपराक दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहराच्या मध्यवस्तीत सरकारी कार्यालया परिसरातील तारांकीत अर्जाच्या नामांकित आलिशान हॉटेल मध्ये शासकीय अधिकारी आणि कंत्राटदार तेही मोजकेच म्हंजे ५ पेक्षाकमी आणि जंगी पार्टीचे बिल फक्त ११,३०० रूपये म्हंजे सर्व सामान्यांची संपूर्ण परिवाराची दिवाळी खरेदीचा अशी माहिती विश्वस्त सुत्रांकडून मिळाली. त्याच बरोबर ५ शुन्य असलेल्या रक्कमाचे तडजोडीची सुद्धा चर्चा चांगलीच रंगात आहे.त्यामुळे अमोल कोमावार यांच्या तक्रारींचा व या पार्टीचा संबंध आहे का? याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे.
अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की,दि.२७ ऑगस्ट २०२० पासून दिलेल्या वर्धा – यवतमाळ – नांदेड नवनिर्मित रेल्वे उत्खननातील गौनखनिज गैरप्रकारा संदर्भातील चौकशी दरम्यान एकदाही ह्या संबंधित प्रकरणाच्या नियोजित स्थळी पाहुनी करणे, पंचनामा कींवा कंत्राटदार उपकंत्राटदार यांची माहिती चैकशी कींवा या संबंधित शासकीय अधिकारी यांची चौकशी केल्या गेलेली नाही.फक्त चौकशीच्या नावाखाली ज्यांनी गौनखनिज विकत घेतले त्यांच्यावर कारवाई केल्या जात आहे . आणि या कारवाई प्रकरणात तक्रारदारालाच गुंतवून कंत्राटदार/उपकंत्राटदार दोषी शासकीय अधिकारी यांना पाठीशी घालण्याचे तालीबानी राजकारण मा. तहसिलदार यवतमाळ यांच्या कडून केल्या जात आहे.तक्रारी करुन सुद्धा मा.जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणाकडे पाठ फिरवली आहे. वर्धा – यवतमाळ – नांदेड नवनिर्मित रेल्वे मार्गातील उत्खननातील गौनखनिज खुल्या बाजारात विकल्या गेले आहे.करोडो रूपयांचा भ्रष्टाचार हा शासकीय कर्मचा-यांच्या सहकार्याने झाला आहे आणि त्यावर हेतुपूर्वक सर्व साक्षी पुरावे असतांनाच सुध्दा टाळाटाळ, विलंब केल्या जात आहे.कारण असे की, दोषींना यातुन पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिल्या जात आहे,पळवाट काढून देण्याचा हा प्रकार आहे.प्रकरण दडपण्यासाठी विविध मार्ग अवलंबतांना स्पष्ट निदर्शनास येत आहे.सरकारी अधिकार्याच्या या वागण्यामुळे आणि दोषींवर कारवाही करण्याकरिता, भ्रष्टाचार उघडकीस येऊन सुद्धा कारवाई होत नसल्याकारणाने तक्रार दाराने शेवटी आत्मदहनाचा मार्ग अवलंबिला जेधे करून आता तरी वरीष्ठांचे डोळे उघडतील आणि त्यामुळे दोषी अधिकार्यांमध्ये कारवाईच्या भिंतीने खळबळ उडाली आहे.