Home विदर्भ शिवाजीराजे प्रतिष्ठाण तर्फे गरीब व गरजू कुटुंबांना मदतीचा हात…!

शिवाजीराजे प्रतिष्ठाण तर्फे गरीब व गरजू कुटुंबांना मदतीचा हात…!

610

यवतमाळ : येथील विर शिवाजीराजे प्रतिष्ठाण तर्फे गरीब व गरजू कुटुंबांना दिवाळीचा आनंद द्विगुणीत व्हावा या साठी धान्य वाटप करण्यात आले. या वर्षी यवतमाळ नजीक गोधणी या गावातील २ गरीब व गरजू कुटुंबाला धान्य देण्यात आले.


मागील ५ वर्षापासून दरवर्षी प्रतिष्ठाणचा हा स्तुत्य उपक्रम सुरु आहे. तसेच वर्षभर प्रतिष्ठाणच्या वतीने आपणही समाजाचे काही देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवल्या जातात.
हा आयोजित करण्यात आलेला स्तुत्य कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद अवसरे, प्रतिष्ठानचे सचिव राहुल राठी आदिन्नी पुढाकार घेतला. तसेच सदस्य निरज येवतीकर, सागर लाकडे, आकाश राठी, पियुष राठी, आतिष देशमुख, शुभम पाटील, वैभव वंजारी, अक्षय भोयर तसेच गोधणी गावचे सरपंच सौ. प्रणिता राजेश डंभारे, उपसरपंच श्री अजाबराव मारेकर, श्री राजेश डंभारे, ग्रामपंचायत सदस्य श्री शंकरराव भिसे, सुभाष तोडसाम, ग्रामपंचायत कर्मचारी विशाल सूर्यवंशी, अमोल रणख़ाम्ब आदि गावातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रधार प्रसाद अवसरे यांनी सर्व सदस्य आणि गावातील नागरिक यांच्या सहकार्यासाठी आभार व्यक्त केले.