
जालना – लक्ष्मण बिलोरे
सोमवारी दिनांक १८-१०-२०२१ रोजी आरग या. मिरज जिल्हा.सांगली येथे आयोजित कार्यक्रमात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मैत्रेय प्रतिनिधी उपस्थित राहून मा. ना. श्री. जयंत पाटील साहेब, जल संपदा मंत्री यांना समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले.

मैत्रेय प्रकरणातील पीडित ठेवीदारांना परतावा शासनाकडून लवकर मिळवून देण्यासाठी लेखी निवेदन द्वारे विनंती करण्यात आली , माननीय मंत्री महोदयांनी महाविकास आघाडी कडून लवकरच सर्व पीडित ठेवीदारांना योग्य न्याय व त्यांच्या हक्काच्या परतावे मिळवून देण्याबाबत प्रयत्न करणार आहेत असे अश्वासन दिले . मैत्रेय प्रकरण मध्ये गुंतवणूकदारांना लवकर परतावे मिळावे म्हणून धुळे चे मा.आमदार अनिल अण्णासाहेब गोटे साहेब. यांच्या अथक प्ररिश्रमने परतावे मिळविण्या करीता प्रयत्न करत आहेत व या पुढे ही सातत्याने प्रयत्न करणार आहेत. या साठी श्री नानासाहेब पाटील सर व सौ.उषाताई पाटील मॅडम धुळे जिल्हा यांचे व सर्व जिल्ह्य़ातील मैत्रेय प्रतीनिधींकडून सहकार्य लाभत आहे. श्री.गंगाधर तोडकर(भैय्या) यांनी उत्तम समन्वय साधून दिले. कोल्हापूर जिल्ह्यातून यासिन सय्यद सर, रेहाना सय्यद मॅडम, नलवडे सर, सर्जेराव जाधव सर, डाॅ.जगन्नाथ कदम सर,श्याम गायकवाड सर, श्रीमती .हेलनताई चोपडे मॅडम, सांगली-मिरज भागातून दत्ता शिंगाडे सर, खटावकर सर*, *पी.बी.पाटील सर, राजेश बोंगाळे सर, पी.एस. पाटील सर, मारुती गंगाधर सर, संदीप घसघसे सर, डॉ. जी.एन. हरपनहळ्ळी सर, महावीर म्हैशाळे सर,जयवंत पवार सर. सौ.निलीमा कुष्टे मॅडम, त्यांच्या सहकारी सांगली व सांगलवाडी येथील महिला प्रतिनिधी, सौ.सावंत मॅडम ( तासगाव) व त्यांच्या सहकारी महिला प्रतिनिधी असेबहुसंख्य पीडित प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून मैत्रेय प्रकरणाचा पाठपुरावा करणे साठी सहकार्य केले श्री. यासिन सय्यद सर यांनी सर्वांचे संपर्कात राहून, विशेष परिश्रम घेवून समन्वय साधले आणि उपस्थितांचे आभार मानले या प्रकरणात लवकरच प्रगती होईल असे वाटते.











































