Home नांदेड श्री दत्तशिखर घाटात चार चाकी वाहनाला अपघात. 13 भाविक जखमी.

श्री दत्तशिखर घाटात चार चाकी वाहनाला अपघात. 13 भाविक जखमी.

1927

मजहर शेख,नांदेड

नांदेड/श्रीक्षेत्र माहूर,दि : १० :- वझरा येथील शे.फरीद बाबाच्या दर्शनास जात असतांना एम.एच.04, एफ. जे.0551 या क्रमांकाचे चार चाकी वाहन (टाटा छोटा हाती ) दि.10 ऑक्टो.रोजी सकाळी .9 वा.चे सुमारास पलटले.त्यात आर्णी येथील 13 भाविक जखमी झालेत.सर्व जखमी भाविकांना ग्रामीण रूग्णालयात भर्ती केले असता, प्राथमिक उपचारां नंतर 6 जणांना यवतमाळला स्थलांतरीत केले आहे.
दत्तशिखर घाटात वाहन चालकाला घाटाचा अंदाज आला नसल्याने सदरचे वाहन पलटले. त्यात स.इरफान स.मनसूर (28),शे.मदरोद्दिन शे.नज़रोद्दिन (70),रहीमखान शे.रज्जाक (30),फय्याज शे.मुनाफ (13),मुजीमखान नूरखान (45),शारीक शब्बिर शे.(28) या भाविकांवर डॉ.उदय काण् णव,दत्ता पालटवार,एल.जी.मेंडके,निलेश बीलापेकर,परमेश्वर जुडे,गजानन भोपाळे , आव्हाड , शिंदे , पोखरे , सोनकांबळे,खराटे,ललिता मुंडेकार यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना यवतमाळला हलविण्यात आले.स.फारुख स.शेख (26),शे.साबीर शे.मस्तान (45),रूखसूना बेगम सुभेदार खान (40),शे.अहेमद शे.हनीफ (52),शे.खाजा शे.अजीज (35), साजीद मलनस हरून (39),अयान पठाण अमन (11) हे किरकोळ जखमी असून त्यांचेवर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.