
प्रतिनिधी-( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव राजा:-तालुक्यातील देऊळगाव मही येथील राजेंद्र अरुण शिंगणे यांच्या शेतातील फार्ममधील ३६ हजार ८००रुपयांच्या कोंबड्या लंपास केल्याची घटना २९सप्टेंबर रोजी रात्रीदरम्यान देऊळगाव मही येथे घडली .याप्रकरणी ३०सप्टेंबर रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देऊळगाव मही येथील रहिवासी राजेंद्र अरुण शिंगणे यांच्या शेतात कोंबड्यांचा फार्म आहे.
२९ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी पोल्ट्री फार्मची जाळी वाकवून पोल्ट्री फार्ममध्ये घुसून अंदाजे ३६ हजार ८००रुपये किमतीच्या एकूण ९२ कोंबड्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहे. यासंदर्भात राजेंद्र अरुण शिंगणे रा.देऊळगाव मही यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यावरून अज्ञात चोरत्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











































