
यवतमाळ – येथील सौ. रितू गायकवाड यांना बेटी फाउंडेशन, (यवतमाळ) महाराष्ट्र येथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2021 मध्ये ‘आंतराष्ट्रीय सेवारत्न’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर कार्यक्रम हा २६ सप्टेबर २०२१ ला प्रिन्स लाॅन ,वणी यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला अध्यक्ष मा. पांडुरंग टोंगे, उद्घाटक मा. शाम सोनटक्के, स्वागताध्यक्ष मा.तारेन्द्र बोर्डे नगराध्यक्ष वणी मा जागृती काला गुजरात हे उपस्थित होते.
सदर पुरस्कार हा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर बेटी फाउंडेशनच्या माध्यमातून दिला जातो. सेवाभाव ही प्रतिमा सैनिक, डॉक्टर, नर्स यांच्याकरिता विशेष प्रचलित आहे, परंतु समाजाचा घटक या नात्याने समाजबांधिलकीच्या स्वरूपात वैयक्तिक वा सामूहिक स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून, इतरांनाही प्रेरणा व समाजातील नवीन आव्हान देण्याची क्षमता निर्माण करण्याकरता हा पुरस्कार ओळखला जातो, सौ रितू गायकवाड या इनर्व्हील क्लब यवतमाळ ज्वेल्सच्या अध्यक्षा आहेत,त्याच प्रमाणे अस्तीत्व फाउंडेशन, तनिष्का व्यासपीठ, संस्कार कलश ग्रुप, व सावित्रीबाई फुले सोसायटी महिला मंडळ च्या त्या सभासद आहेत,,,
सामाजिक कार्यात वृक्षारोपण,गरजूंना धान्य वाटप, पाठ्यपुस्तक वाटप, कोरोना योध्याचा सन्मान, योगशिबीर,महिला दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम व रक्तदान शिबिर या सारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत त्यांच्या या कार्याची दखल बेटी फाउंडेशन ने घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहेत,सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.










































