
दोघांना वाचवण्यात यश ,
विनोद पत्रे ,
यवतमाळ, 28 सप्टेंबर : मुसळधार पावसात एसटी बस थेट पाण्यात कोसळल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटीच्या हिरकणी बसला अपघात झाला आहे. बस थेट पाण्यात कोसळली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरापासून काही अंतरावर ही दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नदीवरुन पाणी वाहत असताना एसटी बस चालकाने नको ते धाडस करत प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. या पुलावरुन पाणी वाहून जात असतानाही चालकाने त्या पाण्यातून गाडी नेली आणि पाण्याच्या प्रवाहात ही बस वाहून गेली. या अपघाताचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओत एसटी बस थेट पाण्यात वाहून जात असताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत बसमधील प्रवासी आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत. बसच्या टपावर अडकलेले प्रवासी मदतीसाठी हाक देत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या एसटी बसमध्ये 5 प्रवासी होते घटनास्थळी मोठ्या वेगाने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे. तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अद्याप एसटी चालक आणि एसटी वाहक यांची माहिती मिळू शकलेली नाहीये.
गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. नद्या ओसंडून वाहत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत.
त्या वाहुन गेलेल्या ST मध्ये 5 प्रवासी पेक्की 3 तीघांची जल समाधी तर2 जण सुखरूप
गुलाब चक्रीवादाळामुळे राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार पाऊस सुरु असताना एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न जिवावर बेतला आहे.
सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान नांदेडहून नागपूरला पुसदमार्गे जाणारी बस उमरखेडपासून दोन किमी दहांगाव नाला पार करत असताना पुराच्या पाण्यात बस वाहून गेली. पुराच्या पाण्यातून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न बस चालकाने केला. मात्र, त्यावेळीच बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. बसमध्ये साधरणमध्ये पाच जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी ५०१८ ही बस नांदेडहून पूसदमार्ग नागपूरला निघाली होती.दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थितीती उद्भवली आहे. उमरखेडपासून दोन किमी अंतरावर असलेल्या दहांगाव नाला येथून चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूराच्या पाण्याच्या वेग जास्त होता. यामध्ये बस वाहून गेली आहे.
उमरखेड ते पुसद मार्गावर दहागाव नाल्यावर नागपूर आगाराची बस क्र. ५०१८ वाहून गेली. या बसमध्ये पाच जण होते. दोन प्रवाशांना वाचवण्यात यश असून तीन मृतदेह मिळाले. आहे. घटनास्थळापासून 50 मीटरवर बस आढळल्याची माहिती यवतमाळचे प्रभारी विभाग नियंत्रक अविनाश राजगुरे यांनी दिली.











































