Home विदर्भ बसच्या फेऱ्या नियमित वेळेवर सुरु कराव्या युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थेची हिंगणघाट...

बसच्या फेऱ्या नियमित वेळेवर सुरु कराव्या युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थेची हिंगणघाट बस डेपो आगारप्रमुखा कडे मागणी

200

प्रतिनिधी:-  प्रमोद झिले, येरला

वर्धा /  हिंगणघाट –   कोरोना काळात मागील एक वर्षापासून शाळा, खाजगी शिकवणी वर्ग, तांत्रिक शिक्षण संस्था आणि संगणक शिकवणी वर्ग बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आणि आता एक महिना झाला शाळा सुरु होऊन पण वडनेर परिसरातील टेंबा, दोंदुडा, शेकापूर, धानोरा व वेणी – जागोना या ग्रामिण भागातील बसेस वेळेवर सोडत नसल्याने विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत याला उशीर होतो व सायंकाळी घरी जाण्यासाठी बस ची खूप वाट पाहावी लागते. त्यामुळे वडनेर परिसरातील टेंबा, दोंदुडा, शेकापूर, धानोरा व वेणी – जागोना या मार्गांवरील बस फेऱ्या नियमित आणि वेळेवर सुरु कार्यासाठी बस डेपो आगारप्रमुख हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दूरतकर, जनसंपर्क अधिकारी विकास तिजारे, झेप सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सुपटकर यांची उपस्थिती होती.