
देवानंद जाधव
यवतमाळ – दिनांक २६/०९/२०२१ रविवारी ठिक ११.०० वाजता सकाळी पंडित दिनदयाल प्रबोदिनी निळोना, गोंधनी यवतमाळ येथे राज्याध्यक्ष श्री.विजयजी म्हैसकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यकारणीची सभा पार पडली.सभेत अनेक ग्रामसेवक हितांचे निर्णय घेण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त कामाचा ताण कमी करणे, ग्रामसभा ४ ठेवणे, वेतन त्रुटितील फरक, नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा करणे किंवा त्यात सुधारणा करणे, यवतमाळ जिल्हातिल प्रशिक्षण केद्र बुलढाणा ऐवजी अमरातीला करणे, तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ १३७० सभेत श्री.किरुळकर साहेब, राज्य सरचिटणीस यांनी पदोन्नती व तब्बेतीच्या कारणाने पदाचा राजिनामा दिला.श्री.विजयजी म्हैसकर साहेब राज्याध्यक्ष यांनी कालावधी संपल्यामुळे राजीनामा दिला.यामुळे कार्यकारणीतील रिक्त पदांची निवड बहुमताने खालील प्रमाणे केली.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्यध्यक्ष पदी श्री.तात्यासाहेब पाटील सोलापुर, तर सरचिटणीस पदावर श्री. एस.डी पाटील साहेब कोल्हापुर,राज्य कार्याध्यक्ष श्री.सागर मोकाशी साहेब सांगली, राज्य उपाध्यक्ष श्री संजय मिरजकर नांदेड, प्रसिद्धी प्रमुख श्री. नवनाथ गोरे आबा अहमदनगर, सहसचिव राज्य श्री.लक्ष्मण नागरगोजे मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी संभाजीराजे बनकर औरंगाबाद व विभागीय सचिव पदी दत्ता कुरूंदे यांच्या सर्व निवडी अविरोध पणे झाल्या.
सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे हार्दीक हार्दीक अभिनंदन स्वागत करण्यात आले.अध्यक्ष श्री. विजयजी म्हैसकर साहेब व सरचिटणीस श्री. किरुळकर साहेब यांनी ग्रामसेवक संघाची अस्मिता जागी ठेवुन अनेक चांगले निर्णय आपल्या संवर्गासाठी करुन घेतलेले आहेत.परंतु तब्बेतीच्या कारणाने , कालावधी संपल्यामुळे विशेषत:त्यांचा राजिनामा सभागृहाने नामंजूर केल्यावरही एक तरुण तडपदार फळीला संधी देण्यासाठी त्यांनी स्वत:हुन पदाचा त्यांग केला असे आपले माऊली श्री.विजयजी म्हैसकर साहेब यांनी यामुळे सर्वाचे स्वागत करण्यात केले.तसेच पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या सभेकरिता रविकांत रेहपाडे राज्यउपाध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष,सागर सरावणे’ कोल्हापूर, अशोक जी गायकवाड ,औरंगाबाद’, विलास मुंडे भंडारा, माकडे,गडचिरोली,तेलमासरे ,सी.एम.शिंदे सातारा यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ १३७० जिल्हा शाखा यवतमाळ यांनी आयोजकांची भुमिका पार पाडली.सर्व राज्यातिल व जिल्हातिल ग्रामसेवक बांधवांनी सभेच्या नियोजनांची स्तुस्ती केली. संपूर्ण राज्यभर मधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी मनोगतामध्ये ग्रामसेवकाच्या अनेक समस्येवर चर्चा केली अनेक अभ्यासू मान्यवरांचे मार्गदर्शन झाले उपस्थितांनी संवर्गाच्या त्रासदायक कामामध्ये निश्चितपणे बदल होईल असा आशावाद व्यक्त केला. सुत्र संचालन श्री.गोविंद इंगोले साहेब श्री.राजेद्र खरतडे साहेब यांनी केल्यानंतर आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.यावेळी राज्यातुन भरपुर ग्रामसेवक यांनी प्रतिसाद दिला.










































