Home मराठवाडा उपक्रमशील शिक्षक विवेक कुलकर्णी करताहेत भित्ती पत्रकाद्वारे जनजागृती

उपक्रमशील शिक्षक विवेक कुलकर्णी करताहेत भित्ती पत्रकाद्वारे जनजागृती

174

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्यातील आवलगाव बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक विवेक कुलकर्णी हे “मिशन कवच-कुंडल” या जालना जिल्हा परिषदेमार्फत चालू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेची भित्तीपत्रकाच्या माध्यमातून जनजागृती करत असून,त्यास ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


विवेक कुलकर्णी यांनी भित्तीपत्रकाद्वारे “महामारीतील महानायक “साकारले असून, त्यात डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर यांच्या कार्याला सलाम केला आहे. वृक्ष लागवाडीद्वारे ऑक्सीजन सिलेंडर कसे कमी करता येतील, हे दाखवत वृक्ष लागवड, लसीकरणाचे महत्त्व या त्रिसूत्रीचे संदेश देणारी वाक्य रेखाटून जनजागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यासाठी आपणास जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल , शिक्षण व आरोग्य सभापती पूजाताई कल्याण सपाटे, गटशिक्षणाधिकारी रविंद्र जोशी, केंद्रप्रमुख प्रशांत देव यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे विवेक कुलकर्णी यांनी सांगितले.
या आगळ्यावेगळ्या पद्धतीने सुरू असलेल्या जनजागृतीबद्दल सरपंच काकासाहेब कुऱ्हाडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शारदाताई ठेंगडे, मुख्याध्यापक एस. डी. जपे, सर्व सहकारी शिक्षक व गावकऱ्यांनी विवेक कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आहे.