Home विदर्भ सततच्या होणाऱ्या पावसामुळे शेतातील विहीर खचली , ” ऐन हंगामात शेतकऱ्यावर आर्थिक...

सततच्या होणाऱ्या पावसामुळे शेतातील विहीर खचली , ” ऐन हंगामात शेतकऱ्यावर आर्थिक संकट”

530

प्रतिनिधी:- येरला,हिंगणघाट

वर्धा –  दि 19 सप्टेंबर 2021 हिंगणघाट तालुक्यातील हडस्ती येथील शेतकरी संजय मारोती करडीले यांचे शेत सर्वे नबर.144/1ब .तालुक्यातील येरला या शिवारात असून त्या शेती वर विहीर च्या कामासाठी सन 2010 मध्ये बँक चे मार्गेज लोन घेऊन शेतात विहीर तयार केली. पण आता सतत 15 दिवसा पासून होणाऱ्या पाऊसा च्या दलदली मुळे विहीर खचली त्यामुळं शेतकऱ्यांसमोर परतीचा पाऊस गेल्या नतर रबी पिकासाठी विरीच्या पाण्याची पिकाना गरज असतात. तर ते पाणी कुठून द्यायचं आणि पिकच नाही घेता येणार तर बॅंकचे लोन कसे द्याचे हाच मोठा प्रश्न पडला. अश्या तुटीच्या काळात शेतकऱ्यांचे 80 हजार नुकसान झाले .अल्पभूधारक शेतकरी या घटनेची माहिती मिळताच तलाठी भिगरूट यांनी दिली महसूल विभाग अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे