Home जळगाव मुलांसमोर बापा ने बायकोला सुनावले मुलांनी बापाला डायरेक वरती पाठवले , ?

मुलांसमोर बापा ने बायकोला सुनावले मुलांनी बापाला डायरेक वरती पाठवले , ?

364

 

 

पोलिसांनी मुलांना ठोकल्या बेड्या , 

ऐजास शाह ,

जळगाव : आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन बाप सतत आईशी वाद घालवून मारहाण करणाऱ्या बापाचा संतप्त दोघां मुलांनी छातीत चॉपर खुपसून खून केल्याची घटना आज रविवारी सकाळी साडे दहा वाजता निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालयाजवळ घडली . याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या पोलिसांच्या समोरच ही घटना घडल्याने त्याने तात्काळ संशयित मुलांच्या हातात बेड्या ठोकल्या प्रेमसिंग अभयसिंग राठोड ( वय ५० , रा . निमखेडी रोड , मुळ रा . घनशामपुर , ता . खकनार , जि . बुरहणापूर ) असे मृत वडीलांचे नाव आहे . त्यांची मुले गोपाळ ( वय १८ ) व दीपक ( वय २२ ) यांनी हा खून केला आहे . मिळालेल्या माहितीनुसार , प्रेमसिंग राठोड यांच्या पत्नी बसंतीबाई व दीपक , गोपाळ , कविता , शिवाणी ही चार मुले गेल्या दोन वर्षांपासून निमखेडी रस्त्यावरील लता राजेंद्र लुंकड यांच्या घरी भाड्याने राहतात . घरासमोरील शेडमध्ये विशाल राजेंद्र चोपडा यांच्या मालकीचे गुरे राखण्याचे काम राठोड कुटुंबीय करीत होते . तसेच गोपाळ व दीपक हे दोघे मजुरी देखील करायचे . दरम्यान , प्रेमसिंग हे नेहमी पत्नी बसंतीबाई यांच्या चारीत्र्यावर संशय घेत असत . त्यांच्या कानाची शस्त्रक्रीया करायची असल्यामुळे रविवारी त्याला शहरातील दवाखान्यात नेऊन नंतर ब – हाणपूर
येथे घेऊन जाण्याबाबत मुलगा गोपाल व दीपक या दोघांनी आग्रह केला . यावेळी प्रेमसिंग याने त्यास विरोध करुन तिकडे गेल्यावर मागे पत्नी दुसऱ्या लोकांच्या संपर्कात राहते असे बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला . त्यामुळे मुले व बाप यांच्यात वाद झाला . दीपक याने दांडक्याने बापाला मारले तर प्रेमसिंग याने घरात लपवून ठेवलेला चॉपर आणून दोन्ही मुलांवर हल्ला करणार तितक्यात गोपाल याने हा चॉपर हिसकावून प्रेमसिंग याच्या छातीवर , डोक्यावर कमरेजवळ वार केले . त्यात प्रेमसिंग जमिनीवर कोसळून जागेवरच त्यांचा मृत्यू झाला . भररस्त्यावर ही घटना घडत असताना तालुका पोलिस ठाण्या कर्मचारी शाम बोरसे याच रस्त्याने दुचाकीने येत होते . त्यांनी पाहीले असात , यावेळी प्रेमसिंग रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते . तर गोपाळ हातात चाकु घेऊन तेथेच उभा होता . मोठा मुलगा दीपक हातात काठी घेऊन घटनास्थळावरच होता . गोपाळ याने चाकुने वार केल्याचे बोरसे यांना दुचाकीवरुनच दिसले होते . त्यामुळे बोरसे यांनी तात्काळ दीपक व गोपाळ या दोघांना पकडून ठेवत पळुन जाऊ नये म्हणून त्यांच्या हातात बेड्या घातल्या . पोलिस ठाण्यात फोन करुन घटनेची माहिती दिली . थोड्याच पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पथक घटनास्थळी आले . त्यांनी गोपाळ व दीपक या दोघांना ताब्यात घेतले . तर घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला . या प्रकरणी मृत प्रेमसिंग यांचे भाऊ रोहिदास अभयसिंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गोपाळ व दीपक विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिस निरीक्षक कुंभार तपास करीत आहेत