Home बुलडाणा सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या चिखली तालुकाध्यक्ष पदी छोटु कांबळे यांची निवड

सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या चिखली तालुकाध्यक्ष पदी छोटु कांबळे यांची निवड

479

चिखली/प्रतिनिधी

न दैन्यम न पलायनम हे ब्रिदवाक्य घेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संपुर्ण देशभरात कार्यरत असलेली सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या चिखली तालुकाध्यक्षपदी येथील दैनिक आम्ही चिखलीकर चे संपादक धडाकेबाज पत्रकार छोटु कांबळे यांची निवड संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे,राज्य सचिव अनिल चौधरी , पुणे तर राज्य उपाध्यक्ष रामभाऊ खुर्दळ नाशिक, महासचिव सिध्दार्थ काळे मुंबई,जिल्हाकार्याध्यक्ष बाबासाहेब जाधव,यांच्या आदेशानुसार पत्रकार संरक्षण समितीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष तथा दैनिक लोकमंथन चे निवासी संपादक पुरुषोत्तम बोर्डे,यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सर्वानुमते निवड करण्यात आली.छोटु कांबळे हे एक निर्भीड पत्रकार आहेत समाज हितासाठीच लेखणी चालवतात तर ते सामाजिक श्रेत्रात निस्वार्थ पणे आपले योगदान कायम देत असतात, ते पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी नक्कीच लढतील असा आशावाद बाबासाहेब जाधव यांनी व्यक्त केला आहे.छोटु कांबळे यांची पत्रकार संरक्षण समितीच्या चिखली तालुक अध्यक्षपदी निवड होताच संपुर्ण जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असुन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या वेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष इंजि.अशोक भोसले, सल्लागार डॉ बबनराव परमेश्वर, पत्रकार विनोद खरे,प्रमोद माळी यांनी पत्रकार छोटु कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.