Home विदर्भ दिग्रस येथील ५ युवक कन्हान नदीत बुडाले शोध कार्य युद्ध पातळीवर सुरू 

दिग्रस येथील ५ युवक कन्हान नदीत बुडाले शोध कार्य युद्ध पातळीवर सुरू 

341

यवतमाळ /  दिग्रस  –  बाराभाई मोहल्ला येथील ५ युवक कामठी ता.पारशिवणी जि. नागपूर येथील कन्हान नदीत बुडल्याची दुर्दैवी घटना आज रविवार , दि.५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडल्याने दिग्रस मध्ये एकच खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर असे की, दिग्रस येथील १२ तरुण नागपूर येथे खाजगी वाहनाने ताजुद्दीन बाबा यांच्या शाही संदल साठी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास निघाले होते.पहाटे नागपूर स्थित दर्गाहवर पोहचल्या नंतर ते सर्व जण कामठी येथील दुसऱ्या दर्गाह येथे गेले होते.यामधील आयाज बेग हफिज बेग, सय्यद लक्की सैय्यद परवेज, ख्याजा बेग कालू बेग,मुहम्मद सिबतैन मोहमद इकबाल, मुहम्मद अबुजर मुहम्मद अल्ताफ हे युवक कन्हान नदीत आंघोळीला उतरले असता अचानक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली असून शोध कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.