Home विदर्भ ऑटो व मोटार सायकल चोरणारा अट्टल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात “जिल्ह्यातील...

ऑटो व मोटार सायकल चोरणारा अट्टल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात “जिल्ह्यातील एकूण ०८ गुन्हे उघड”

566

इकबाल शेख – वर्धा 

दिनांक २९-०७-२०२१ रोजी फिर्यादी नामे श्री स्वप्निल तुलसिदासजी खेवले, रा. आलोडा बोरगांव यांची एक जुनी वापरती काळया रंगाची सिल्व्हर निळया रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक एम.एच. ४०/एच-२५१९ चोरी गेल्याने फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे अप. क्र. २७७/२०२१ कलम ३७९ भादंविचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु असतांना दि.०१-०९-२०२१ रोजी मुखबिरद्वारे खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजा कैलासपूरी ता.कळंब जि.यवतमाळ येथे राहणारा इसम नामे गोलु टेकाम हा चोरीची मोटार सायकल घेवून फिरत आहे. अशा खबरेवरून पो.स्टे देवळी परिसरात वायगांव (निपानी) येथे पेट्रोलींग करीत असतांना एक इसम पिवळया रंगाची फुल टि-शर्ट घातलेला मोटार सायकलने संशयीत रित्या भरधाव वेगाने वायगांव (निपानी) चौकातुन देवळीकडे जाताना दिसला. त्याचा पाठलाग करून त्यास वायगांव (निपानी) ते देवळी रोड वरील वाल्मीक गोबाडे याचे अपणा धाबा जवळ थांबविले व त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरज उर्फ भिमराव उर्फ गोलु टेकाम, वय २० वर्ष, रा.कैलासपूर ता.कळंब जि. यवतमाळ असे सांगीतले. सदर आरोपीस कसून चौकशी करण्यात आली असता आरोपीने खालील नमूद गुन्हे केल्याची कबुली दिली.
सदर आरोपीने १) पो.स्टे. अल्लीपूर अप. क्र. २७७/२०२१ कलम ३७९ भादवी मधील चोरीस गेलेली मोटार सायकल क्रमांक एमएच-४०/एच-२५१९ किं. ३०००/-रु, २) पोस्टे अल्लीपुर अप क्र ३२०/२०२१ कलम ३७९ भा.द.वि मधील चोरीस गेलेली होंडा कंपनीची क्र. एमएच-३२/जी-६१८८ कि. १०,०००/- रु, ३) पो.स्टे. अल्लीपुर अप.क्र. २३६/२०२१ कलम ३७९ भा.द.वि मधील चोरीस गेलेली हिरो होंडा क्र. एमएच-२९/ एए-७२८२ कि. २०,०००/- रु., ४) पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. ८४९/२०२० कलम ३७९ भा.द.वि मधील चोरीस गेलेली बजाज कंपनीची क्र एमएच-३२/एएफ-१२२६ कि. २५००/- रु., ५) पो.स्टे देवळी अप.क्र. ४२६/२०२१ कलम ३७९ भा.द.वि मधील चोरीस गेलेली हिरो होंडा क्र. एमएच-३२/एडी-९९५६ कि. २५०००/- रु, ६) पो.स्टे. समुद्रपूर अप. क्र. ३०५/२०२१ कलम ३७९ भा.द.वि मधील चोरीस गेलेली होंडा कंपनीची क्र एमएच-३२/जी-५२३० कि. १५०००/- रु, ७) पो.स्टे. देवळी अप. क्र. ५५१/२०२१ कलम ३७९ भा.द.वि मधील चोरीस गेलेली होंडा कंपनीची क्र एमएच-३२/एफएन-४८३८ कि. १५०००/- रु., ८) पो.स्टे. वडनेर अप. क्र. १९१/२०२१ कलम ३७९ भा.द.वि मधील चोरीस गेलेली तिन चाकी ऑटो क्र. एमएच-३२/सी-६५३२ कि. ४०,०००/- रु. असे एकूण ८ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

वरील गुन्ह्यातील ६ मोटारसायकल एकूण कि. ८३,०००/- रु. जप्त करण्यात आल्या. तसेच गुन्ह्यात वापरलेला जि.ओ कंपनीचा मोबाइल कि १०००/- रु. असा जु. कि ८४०००/- रु. चा माल जप्त करून एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले आहे.
सदर कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड, सपोनि. श्री महेंद्र इंगळे यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. गोपाल ढोले, पोउपनी. सौरभ घरडे, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, नरेंद्र डहाके, प्रमोद पिसे, अविनाश बन्सोड, रामकिसन इप्पर, दिनेश बोथकर, नितेश मेश्राम, प्रदीप वाघ सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली