
इकबाल शेख
वर्धा – दिनांक ३०-०८-२०२१ रोजी फिर्यादी नामे विवेक सिंग नारायण सिंग वय ३६ वर्ष रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट यांनी पो स्टे हिंगणघाट येथे तक्रार दिली कि अनोळखी 02 ईसमांनी एस.बी.आय या बॅंकेचे ए.टी.एम मशीनमधे छेडछाड करून 4,54,000/- रू काढुन नेले आहे. असे फिर्यादीने दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून पो स्टे हिंगणघाट येथे माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नेांद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेल, वर्धा मार्फत करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये संपूर्ण तांत्रिक माहिती काढण्यात आली व मिळालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून यातील नमूद आरोपी हे जिल्हा मोहबा राज्य उत्तर प्रदेश येथे असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून तत्काळ स्थानिक गुन्हे शाखा व सायबर शाखा येथील पथक तयार करून जिल्हा मोहबा राज्य उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आले. दिनांक ०१-०९-२०२१ रोजी नमूद पथक मोहबा येथे पोहचून आरोपीची ओळख पटवून आरोपी १) नीरज नाथुराम निषाद वय १९ वर्ष २) विधी संघर्षित बालक दोन्ही रा. बजरंग चौक, मोहबा, उत्तर प्रदेश यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून ४० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम, ७ मोबाईल व गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन स्विफ्ट डिझायर असा एकुण किमंत 5,92,300/- रु. चा माल हस्तगत करण्यात आला.
तसेच नमूद आरोपिचा पो स्टे हिंगणघाट तर्फे पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला असून आरोपीकडून वर्धा व इतर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे सपोनि. महेंद्र इंगळे, पोउपनी. गोपाल ढोले, पोलीस अंमलदार स्वप्नील भारद्द्वाज, दिनेश बोथकर निलेश कट्टोजवार, अनुप कावळे, विकास अवचट,संघसेन कांबळे विशाल मडावी, अक्षय राउत अंकित जीभे, शाहीन सय्यद, स्मिता महाजन सायबर सेल वर्धा यांनी केली.










































