Home अकोला करोना वेकसीन लसीकरनाच्या नावाखाली भरदिवसा व्यापाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा ,

करोना वेकसीन लसीकरनाच्या नावाखाली भरदिवसा व्यापाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा ,

268

 

 

वृद्ध दाम्पत्याला मारहाण ,

जफर खान ,

प्रतिनिधी/अकोट

अकोला जिल्ह्यातील अकोट गेल्या अनेक दिवसांपासून शांत होते मात्र आजच्या दरोड्याने पुन्हा चर्चेत आले आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक मोठ्या घटना अकोट मध्येच घडतात अशीच आजही एक मोठी घटना अकोट मध्ये घडली असून या घटनेने शहर पोलिसांची डोकेदुखी वाढविली आहे. आज दिवसाढवळ्या व्यापाऱ्याच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकल्याने शहरात खळबळ उडाली असून या घटनेमुळे शहर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहे.
माहितीनुसार आज मंगळवार रोजी अकोट शहरातील प्रतिष्ठित व्यापारी लक्ष्मी हार्डवेअर चे मालक अश्विन सेजपाल आपल्या पत्नीसह लग्नसमारंभा साठी खामगाव येथे गेले असता चोरट्यांनी भरदिवसा घरावर दरोडा टाकून घरातील सदस्यांना मारहाण केली. ही घटना १:३० ते २ वाजताच्या दरम्यान घडली. अश्विन सेजपाल बाहेरगावी गेले असता घरी आई वडील,व मुलगी घरीच होते.

दरम्यान दुपारच्या सुमारास सहा व्यक्ती लसीकरण चौकशी पथक असल्याचा बनाव करून घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. घरातील सदस्यांची प्राथमिक माहिती विचारतांना पथकातील सदस्य हिंदीमधून प्रश्न विचारत होते. यावेळी अश्विन सेजपाल यांची मुलगी देलीशा हिला संशय आला.तिने या लोकांना दरवाजा बाहेरच थांबवून बनावट पथकडे ओळ्खपत्राची मागणी केली.
मात्र त्याचवेळी या पथकातील एका महिलेने जोराने दरवाजा ढकलून आता मध्ये प्रवेश मिळवला,दरवाजा ढकलतात देलीशा कोसळली या वेळी ३ पुरुष,३ महिला यांनी घरात घुसून.देलीशाला आरडाओरडा केल्यास चाकू खुपसण्याची धमकी दिली. देलीशाच्या तोंडात बोळे कोंबून चिकटपट्टी मारत हात पाय बांधण्यात आले.यावेळी स्वयंपाक खोलीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या अमृतलाल सेजपाल हॉल मध्ये परत येत असताना दरोडेखोरांनी एकाएक त्यांच्या चेहऱ्यावर मारायला सुरुवात केली.जखमी झालेले अमृतलाल सेजपाल जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांचे हात पाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली.
अश्विन सेजपाल यांच्या आई इंदूबाई सेजपाल या दुसऱ्या खोलीत असतांना दरोडेखोरांनी त्यांनासुद्धा खुर्चीला बांधून ठेवले.यानंतर घरातील सर्व कपाटातील सामान बाहेर काढून.अस्ताव्यस्त फेकण्यात आले. यावेळी इंदूबाई सेजपाल यांच्या हाताची दोर सुटल्याने त्यांनी देलीशा कडे धाव घेत तिची हाताला बांधलेली दोर सोडली, देलीशा हिने समयसूचकता दाखवीत चेहऱ्यावरील पट्टी हटवून खिडकी जवळ येत मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा केली.
यावेळी तेथेच उपस्थित असलेल्या बंटी सेदाणी याने पहिल्या मजल्यावर कुणीतरी मदतीसाठी आरडाओरडा करत असल्याचे लक्षात आले.त्याने लगेच चंचल पितांबरवाले यांना घेऊन पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी निघाला. मुलगी मदतीसाठी जोरात आरडाओरडा करत आहेत म्हणून घाबरलेल्या दरोडेखोरांनी तेथून पळून जाऊन दरवाजा बाहेरून बंद केला. बंटी सेदाणी आणि चंचल पितांबरवाले मदतीसाठी पहिल्या माळ्यावर पोहचे पर्यंत दरोडेखोर तेथुन पळून जाण्यास सफल झाले.
गजबजलेला चौक म्हणून सोनू चौकांची ओळख आहे सोनू चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बुधवारी वेस भागात भर दुपारी व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा पडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर ,अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले ,शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्यासह ठसे तज्ज्ञ ,श्वानपथक घटनास्थळावर दाखल झाले होते