
,
पती वर नाराज असल्यामुळे केले हे कृत्य ,
अमीन शाह
पती – पत्नीमधील वादामुळे कित्येक वेळा त्यांच्या लहान मुलांना नाहक त्रास सहन करावा लागतो . महाराष्ट्रातील एका महिलेचा आपल्या बाळाला मारहाण करतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता . त्यानंतर तमिळनाडूमधील एका महिलेचाही असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता . तुलसी असं या महिलेचं नाव होतं . अनैतिक संबंधांबाबत पतीसोबत वाद झाल्यानंतर तिने चक्क आपल्या एक वर्षाच्या बाळाला मारहाण केली होती . तिने या सर्व प्रकाराचा व्हिडीओही तयार केला होता . या व्हिडीओमध्ये आपल्या रडणाऱ्या बाळाकडे पाहून ती चक्क हसताना दिसत होती . आता या महिलेचा शोध लागला आहे . आंध्र प्रदेशातील सिंधूर गावात राहणाऱ्या तुलसीचे तमिळनाडूमधील राहणाऱ्या वाडीवाळगनसोबत 2016 मध्ये लग्न झाले होते . गेल्या तीन वर्षांपासून कामाच्या निमित्ताने वाडीवाळगन चेन्नईमध्ये राहत होता . तर तुलसी जिंजी जिल्ह्यातील मेत्तुर गावात राहत होती . या दोघांना प्रदीप ( 1 ) आणि गोकुळ ( 3 ) नावाची दोन मुलं आहेत . मिळालेल्या माहितीनुसार , वाडीवाळगन चेन्नईमध्ये राहत असताना तुलसीचं दुसऱ्या एका व्यक्तीसोबत सूत जुळलं होतं . याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाडीवाळगनने तिला या व्यक्तीसोबत बोलण्यास मज्जावही केला होता . यावरुन त्यांच्यात वादही झाले . या सगळ्यात तीन महिन्यांपूर्वी तुलसीने एक वर्षांच्या प्रदीपला अमानुष मारहाण केली होती . या प्रकाराचा व्हिडीओही तिने तयार केला होता . तुलसी प्रदीपच्या तोंडावर चक्क बुक्के मारताना दिसत आहे . ते बाळ मोठ्याने रडत असूनही तुलसी पुढे त्याला लाथही मारते . एवढं सगळं करुन वर ती बाळाकडे बघून हसत होती . पूर्ण व्हिडीओमध्ये एक वर्षाचं बाळ वेदनेने रडत असूनही , तुलसीला त्याचं काहीच वाटत नाही . हा धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यानंतर वाडीवाळगनने तुलसीला याचा जाब विचारला . मात्र , यावर काहीही स्पष्टीकरण न देता , ती थेट आपल्या माहेरी निघून गेली . यानंतर वाडीवागळनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता . हा व्हिडीओ पाहून केवळ तमिळनाडूच नाही , तर देशभरातील लोकांना धक्का बसला आहे . अनेकांकडून हा व्हिडीओ शेअरही केला जात आहे . दरम्यान ही दोन्ही मुलं सध्या वाडीवागळन सोबत सुरक्षित आहेत . व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या निर्दयी आईचा आता शोध लागला असून या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करीत आहे .
https://youtu.be/p941WNU-YqY











































