Home विदर्भ राष्ट्रीय क्रीडादिनी खेळाडूंचा अपमान

राष्ट्रीय क्रीडादिनी खेळाडूंचा अपमान

362

यवतमाळ – हॉकीचे जागुदर मेजर ध्यानचंद याचा जन्मदिवस २ ९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो . या दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या वतीने नेहरु स्टेडियम येथे माननिय जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीत ९ .३० वाजता राष्ट्रीय खेळाडू असलेल्या लहान मुलांचा ( सेवन साइट्स ) हॉकीचा प्रदर्शनी सामना ठेवला होता . याची पुर्व सुचना माननीय जिल्हाअधिकारी चंद्रकांत उपलवार यांनी दोन दिवसापुर्वी आम्हाला पुर्व सुचना देऊन सकाळी ९ .०० वाजता खेळाचा गणवेशमध्ये उपस्थित राहण्याकरीता सुचना दिली होती . D.S.O. सुचनेनुसार आम्ही एकूण १३ राष्ट्रीय खेळाडू ( वय -१५ ते १८ वर्ष ) सकाळी ८.३० वाजेपासून नेहरु स्टेडीयमवर उपस्थित झालो . परंतू , जिल्हा क्रीडा अधिकारी सरांनी ऐनवेळी प्रदर्शनी सामना रद्द होत असल्याचे सांगितले . कोणतेही कारण न सांगता सामना रद्द झाल्याचे सांगितले . आम्ही वारंवार विनंती करुनही D.S.O. ने आम्हाला कोणताही प्रतिसाद दिला नाही . तर आता तुम्ही जाऊ शकता असे सांगितले .