
रावेर (शेख शरीफ)
जळगाव येथील अलखैर ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष युसुफ शाह यांनी आपले स्वतःचे लग्न शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी वरणगाव येथील अकसा मशिदीमध्ये अत्यंत साध्या व सरळ पद्धतीने संध्याकाळी साडेपाच वाजता लागले.
उपस्थितांना शरबत पाजून जेवणा वळीला फाटा देण्यात आला.
या विवाह सोहळ्यासाठी जळगाव हून खास आमंत्रित मुफ्ती अतिकूररहेमान यांनी साध्या व सरळ विवाह बाबत अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सस यांच्या जीवन चरित्रावरील माहिती विशद केली व आजचा हा विवाह सोहळा याच धर्तीवर होत असल्याने केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे या तत्वावर युसुफ शहा ने आपले विवाह केल्या बद्दल त्यांचे वधू चे वडील साबीर शाह रौशन शाह, वराचे वडील महेबूब शाह यांचे विवाह बाबत अभिनंदन केले.
*विवाह साठी यांनी केली कारवाई*
या विवाह सोहळ्यासाठी वकील म्हणून वरणगाव चे मुशीरशाह सुपडू शाह तर साक्षीदार म्हणून जळगाव मानियर बिरदारीचे फारुक शेख अब्दुल्ला व दुसरे साक्षीदार रशीद शाह हसन शाह होते.
खुतब ए निकाह जळगाव चे मुफ्ती अतिकूररहेमान यांनी पठण केले व या कारवाईत अकसा मस्जिद वरणगाव चे मौलाना महमूद यांनी सहकार्य केले.
*मर्यादित वरात*
या विवाह सोहळ्यासाठी जळगाव येथून मर्यादित वरात आली होती त्यात प्रामुख्याने जळगाव येथील मुस्लिम इदगाह ट्रस्टचे अनिस शाह,अल हिंद चे अलताफ शेख, भुसावळचे नगरसेवक इम्तियाज शेख, उस्मानिया नगर चे समीर शेख ,हाफिस मुसा पटेल, मुक्ताई नगर चे अल्ताफ आझाद, बादशाह आदींची उपस्थिती होती.











































