Home महत्वाची बातमी बालदेव येथील दलितवस्तीमधील सिमेंट रस्त्याचे काम बोगस असल्याची तक्रार

बालदेव येथील दलितवस्तीमधील सिमेंट रस्त्याचे काम बोगस असल्याची तक्रार

153

 

ग्रा.पं.सदस्य प्रितम भगत यांचे विविध स्तरावर कारवाईसाठी निवेदन

फुलचंद भगत
मंगरूळपीर:-तालुक्यातील मौजा बालदेव येथील दलितवस्तीमध्ये सुरु असलेल्या सार्वजनिक सिमेंट रस्ता बांधकाम सुरु असुन ते बोगस दर्जाचे असल्याने सदर काम त्वरीत बंद करुन दोषीवर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रा.पं.सदस्य प्रितम भगत यांनी दि.२३ आॅगष्ट रोजी प्रशासनाकडे मागणी केली आहे.
गटग्रामपंचायत असलेल्या मंगरुळपीर तालुक्यातील बालदेव येथे दलितवस्तीमध्ये सार्वजनिक सिमेंट रस्त्याचे काम सूरु आहे.सदर काम निकृष्ट दर्जाचे सुरु असुन गावकरी आणी ग्रामपंचायत सदस्यांनी तिनवेळा या बोगस कामाविषयी तक्रार दिली होती परंतु प्रशासकीय स्तरावरुन कुठलीही चौकशी आणी कारवाई झाली नाही.ग्रामपंचायत सदस्य प्रितम भगत यांनी दि.२३ रोजी दिलेल्या निवेदनामध्ये सबंधित रोडचे काम हे ठेकेदार आणी अभियंता यांच्या संगनमताने बोगस सुरु असल्याचा आरोप केला आहे. सदर कामाची त्वरीत चौकशी करुन दोषिंवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आमरण ऊषोषण करणार असल्याचा इशारा दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.

प्रतिनिधी-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206