
जालना – लक्ष्मण बिलोरे
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बदनापूर येथील जन आशिर्वाद यात्रेनिमित्त सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी आज शनिवारी,२१ आॅगष्ट रोजी जालना शहरातील गांधी चमन येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.दानवे यांनी हे गेल्या तीन दिवसांपासून जालना जिल्ह्यात जन आशिर्वाद यात्रेनिमित्त दौऱ्यात विविध ठिकाणी सभा घेतली.सभेला प्रतिसादही मिळत आहे.परंतु दानवे हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात माशूर मानले जातात. दरम्यान बदनापूर येथील सभेत दानवे काँग्रेस विरुद्ध गरळ ओकले.काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बद्दल भरसभेत राहुल गांधी म्हणजे ‘काँग्रेसचा वळू’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी आज शनिवारी रोजी जालना शहरातील गांधी चमन चौकात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.











































