Home मराठवाडा जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफर्सची एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफर्सची एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात

204

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

– जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त अंबड,घनसावंगी फोटोग्राफर असोसिएशन व रिस्पेक्ट फाउंडेशन ऑफ वेडिंग फोटोग्राफरच्या वतीने वडीगोद्रीत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये एकदिवसीय कार्यशाळेत अंबड,घनसावंगी तालुक्यातील फोटोग्राफर उपस्थित होते.फोटोग्राफर राम नाईक यांनी सोशल मिडिया फोटोग्राफी बाबतीत महत्व तसेच फोटोग्राफी मध्ये स्वतःच ब्रँड कसा बनवावा.फोटोग्राफरने सोशल मिडियावर जागरूक असणे का गरजेचे आहे.या गोष्टीची माहिती दिली.

यावेळी अभिषेक शेलार यांनी सूर्य प्रकाशाच्या योग्य तो वापर करता आला पाहिजे.फोटोग्राफीमध्ये इतर लाईटचा वापर करून आपण फोटोग्राफी क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवु शकतो.फोटोग्राफी लायटिंग आणि विविध प्रकारच्या लायटिंग टेक्निक बद्दल थिअरी व प्रॅक्टिकल अशा दोन्ही पद्धतीने मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास शहागड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक काळुशे,पंचायत समिती सभापती बापूराव खटके, सरपंच पंढरीनाथ खटके,मनसे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके,किरण तारख,भागवत तारख,श्रीमंत खटके,विजय खटके,देविदास डोंगरे, विश्वभर मचे,आनंद तारख,बाबासाहेब दखने,दिलीप कोटंबे,बाळराज खोजे,निखिल गायकवाड तसेच सर्व पत्रकार व नागरिक उपस्थित होते.