Home मराठवाडा अंकुशनगर येथे कै.शारदाताई टोपे यांना अभिवादन,आई विना मी पोरका झालो- राजेश टोपे

अंकुशनगर येथे कै.शारदाताई टोपे यांना अभिवादन,आई विना मी पोरका झालो- राजेश टोपे

289

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर येथे कारखान्याच्या माजी अध्यक्षा कै.शारदाताई अंकुशराव टोपे यांच्या प्रतिमेला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवार ( ता.२०) रोजी पुजन करुन अभिवादन केले.

या वेळी ना.टोपे यांनी आई बद्दल जुन्या आठवणीला उजाळा दिला.संपूर्ण कुटूंबाला शारदाताई यांनी मायेचा अधार दिला.आपले दु:ख बाजुला ठेवुन सगळ्यांची काळजी घेतली.

वडील कै.अंकुशराव टोपे,आई कै.शारदाताई टोपे यांनी दिलेल्या संस्कारामुळे मला सर्वसामान्य माणसाचे कामे करण्यासाठी ऊर्जा मिळत आहे.आई विना मी पोरका झालो असल्याचे ना.राजेश टोपे यांनी सांगितले.संपूर्ण कुटूंबाच्या उपस्थितीमध्ये प्रथम श्राध्द विधी संपन्न झाला.

या कार्यक्रमाला स्वप्निल कापडणीस उप विभागीय अधिकारी,अंबड,तहसिलदार विद्याचरण कवडकर ,संजय टोपे,सतिष टोपे,संदीप टोपे,संभाजी टोपे,शरद टोपे,अमोल टोपे,गणेश टोपे,मनिषा टोपे,वर्षा देसाई,संग्राम देसाई,उत्तमराव पवार,मनोज मरकड,अमरसिंह खरात,व्यवस्थापकीय संचालक बी.टी.पावसे,कार्यकारी संचालक दिलीप पाटील,स्विय साहाय्यक शेषराव हुलमुख,नितीन भवर,ए.जी.पठाण,सुधाकर खरात,आर.डी.पगार,दिलीप दखने,कारखान्याचे संचालक किरण तारख,बाबासाहेब कोल्हे,विकास कव्हळे,सरदारसिंग पवार,सुरेश औटे,अशोक अघाव आदी कर्मचारी,कामगार,कार्यकर्ते उपस्थित होते.