Home बुलडाणा टिप्परच्या भीषण अपघातात 13 मजुरांचा मृत्यू 2 जखमी ,

टिप्परच्या भीषण अपघातात 13 मजुरांचा मृत्यू 2 जखमी ,

576

 

2 जखमी मजुरांची प्रकृती चिंताजनक ,

 

अमीन शाह

तढेगाव सिंदखेडराजा येथून ,

लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन मोठा अपघात झाला असून या अपघातात तब्बल 12 मजुरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली असून सर्व जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगाव-दुसरबिडच्या मध्ये सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कॅम्प जवळ झाला हा अपघात झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी हायवेच्या कामावर हे मजूर जात होते. त्याच दरम्यान समोरून शिवशाही बस येत होती समोरून येणाऱ्या बस ला साईड दिल्या मुले व पाऊस सुरू असल्या मुळे रस्त्याची कळा घसरली व टिप्पर पलटी झाला तळेगाव येथे हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर काम करणारे हे सर्व मजूर मध्य प्रदेश चे होते .
एकूण 15 मजूर होते आणि त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. डुएल बार घेऊन जाणाऱ्या टीप्पर मध्ये बसलेले मजूर भारीभरकम लोखंडी डबल बार खाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला. , सदर घटने मुळे दुःख वयकत केले जात आहे या दुर्घटनेत मृतकांचा आकडा वाढण्याची भीती वयकत केली जात आहे ,

*मृत मजूर*

(1) गणेश जगदिश डावर वय 21 वर्ष रा. मेणखेडी ता. मेश्वर जि. खरगोन मध्यप्रदेश, (2) गोविंद सिलाटे वर्ष 28 वर्ष रा. बोडल ता. दाणी जि. धार मध्यप्रदेश, (3) लक्ष्मण घन्नालाल डावर वय 28 वर्ष रा. मोहेदा ता. मेश्वर जि. खरगोन मध्यप्रदेश, (4) मिथुन मचारे वय 18 वर्ष रा. कातर ता.जि. धार मध्यप्रदेश, (5) दिपक प्रताप डावर वय 19 वर्ष रा. मेलखेडी ता. मेश्वर जि. खरगोन मध्यप्रदेश, (6) सुनिल प्रताप डावर वय 25 वर्ष रा. मेलखेडी ता. मेश्वर जि. खरगोन मध्यप्रदेश, (7) नारायण विक्रम डावर वय 25 वर्ष रा. मेलखेडी ता. मेश्वर जि. खरगोर मध्यप्रदेश, (8) करण मकवणी वय 21 वर्ष रा. काकलपुरा ता. दाणी जि.धार मध्यप्रदेश, (9) जितेंद्र शंकर मकवाणी वय 16 वर्ष रा. मक्षी ता. मेश्वर जि. खरगोन मध्यप्रदेश, (10) दिनेश मोरसिंग गावड वय 30 वर्ष रा. हनुमंत्या ता. धरमपुरी जि. धार मध्यप्रदेश, (11) महेश कटारे वय 31 वर्ष रा. बबलपी ता. मेश्वर जि. खरगोन मध्यप्रदेश, (12) देवराम पुंजीलाल ओसारी वय 20 वर्ष रा. काचीकुंआँ ता. मेश्वर जि. खरगोन मध्यप्रदेश, (13) दिलीप कटारे वय 21 वर्ष रा. अंबापूरा ता. घरमपुरी जि. धार मध्यप्रदेश यांचा समावेश आहे.

जखमी मजुर

(1 ) लोकेश कैलास मकवाणी वय 19 वर्ष रा. काकलपुरा जि.धार मध्यप्रदेश, (2)रघुनाथ उमरा बाब वय 50 वर्ष रा. बडनेर ता. मेसवार जि. खरगोन
मध्यप्रदेश.

देव बलवत्तर म्हणून ती चिमुकली वाचली , ???

दुर्घटना घडली तेव्हा एक आठ वर्षाची चिमुकली त्या टिप्पर च्या केबिन मध्ये बसली होती टिप्पर पलटी होताच चालक फरार झाला मदत कार्य करणाऱ्या लोकांना ही चिमुकली दिसून आली तिचा नाव छब्बू होता तिला या अपघातात खरचटले सुद्धा नाही ,