Home नांदेड मांडवी पोलीसांनी मोटरसायकल चोरांना अटक करून, १ लाख ८० हजारांच्या सहा मोटारसायकल...

मांडवी पोलीसांनी मोटरसायकल चोरांना अटक करून, १ लाख ८० हजारांच्या सहा मोटारसायकल केल्या जप्त.

254

मजहर शेख, नांदेड

नांदेड/किनवट, दि : १२:- मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कनकी येथील विलास विठ्ठल वाडगुरे यांची मोटारसायकल चोरी गेली होती याची फिर्याद दि.8 ऑगस्ट रोजी मांडवी पोलीस ठाण्यात दिल्याने,सपोनि मल्हार शिवरकर यांनी तपासाचे चक्र गतीने फिरवून आरोपी संदीप पंडित जाधव रा.हिवळणी ता.माहुर आणि अक्षय रमेश पवार रा.उमारा ता. माहुर यांना अटक करून पोलीसांची खाकी दाखवताच दोन्ही आरोपी पोपटासारखे बोलुन विलास वाडगुरे यांची मोटारसायकल व अन्य पाच मोटारसायकल चोरल्या ची कबुली दिली. ते सहा मोटारसायकल मांडवी पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि मल्हार शिवरकर हे करीत असुन त्यांना पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे, पोलिस उपनिरीक्षक पठाण, पोहेका जाबुवंत कदम, पोहेका भारत राठोड, पोका. श्याम चव्हाण, नितेश लेंडगुरे, नामदेव कदम हे सहकार्य करत आहे.