Home मराठवाडा मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – राजेश...

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – राजेश टोपे

321

सरकार न्याय देईल अशी आशा आहे,नाही दिल्यास आंदोलन…मनोज जरांगे

 

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४५ मराठा तरुणांच्या कुटूंबियासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली. टोपे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करून प्रत्येक कुटुंबाला शासकिय नोकरी आणि 10 लाख रुपये आर्थिक मदत देवू असे आश्वासन सरकारने दिले होते. याविषयी चर्चा केली आणि हा प्रश्न तातडीने लगेच मार्गी लावण्याच्या सूचना ही केल्या

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

या सर्व कुटुंबियांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. आणि मागिल सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा शब्द टोपे यांनी त्या कुटुंबियांना दिला.
मुख्यमंत्री यांच्या स्वीय सहाय्यक यांनी फोनद्वारे मंत्री राजेश टोपे यांना सांगितले की, त्या सर्वांचे कागदपत्रे घ्या. आर्थिक निधी पाठविण्यासाठी कुटुंबियांचे बँक खाते क्रमांक पाठवा.आम्ही लवकरात लवकर मदत पाठवतो. टोपे साहेबांनी मुख्यमंत्री कार्यालयास सांगितले की, शासकीय नोकरीत घेण्यासाठी काही जाचक अटी आहेत त्या शिथिल कराव्यात आणि विशेष बाब म्हणून या सर्वांना घेण्यात यावे याविषयी थोड्याच दिवसात मुख्यमंत्री साहेबांसोबत एक बैठक होणार आहे आणि कुटूंबियांना तातडीने न्याय देण्यासाठी ना.राजेश टोपे यांनी स्वतःहा पुढाकार घेऊन, न्याय देण्याचा शब्द दिला असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
यावेळी अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटिल, बाळूभाऊ नरवडे, श्रीराम कुरणकर, मयूर पांगारकर,मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले ४५ तरुणांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.