
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
– शाळेत असताना विद्यार्थी जीवनात आपण ‘ चोर – पोलिसांचा ‘ खेळ खेळलो ,मात्र संसारिक जीवनात अस्सल चोर -पोलिसांचा खेळ कसा असतो याचा थरारक प्रसंग नक्कीच दमछाक करणारा आहे या बाबतीत अनुभुव ग्रामस्थांनी प्रत्यक्षात अनुभवला .त्याचे असे झाले.घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे गुरूवारी ५ आॅगष्ट रोजी रात्री पोलिसांची गस्त सुरू असताना चोरटे येथील आझाद नगर,नुतन वसाहत,शाहूनगर भागात चोरीच्या इराद्याने घुसले याबाबत काही जागरूक नागरिकांना चाहूल लागली.त्यांनी लगेच पोलिसांना संपर्क साधला त्यावेळी गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी विष्णु कुटे यांना माहिती दिली.कुटे यांनी सायरन वाजवत चोरट्यांचा पाठलाग करत माग काढला.सायरनच्या आवाजाने चोरटे पोलिसांशी लपंडाव खेळत होते.पोलिसांनी संपुर्ण परिवार पिंजून काढला परंतु चोरटे नजरेत आले नाही.पोलिसांचे वाहन फिरताच चोरट्यांनी आपला मोर्चा शाहुनगर भागात वळवला आणि एका घराचे गेटचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.शेजारच्या शिक्षकांनी हि बाब लक्षात येताच घर मालक धोत्रे यांना फोन केला.धोत्रे यांनी उपसरपंच मनोज गाडे यांना चोरट्यांनी वस्तीत शिरकाव केल्याची माहिती दिली.मनोज गाडे यांनी तत्परतेने पोलिसांना खबर दिली.गस्तीवरील पोलिस कर्मचारी विष्णु कुटे यांनी लगेच शाहू नगरच्या दिशेने गाडी वळवली पोलिस आल्याची चाहूल लागल्याने चोरटे अंधारात पसार झाले.हा थरारक ‘ चोर- पोलिसांचा खेळ’ रात्रभर चालला , यामध्ये पोलिसांची दमछाक झाली.पोलिसांची गस्त आणि जागरूक नागरिक यांच्यामुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला .गस्तीवरील पोलिस कर्मचारी विष्णु कुटे यांनी प्रसंगावधान राखत चोरट्यांचा पाठलाग केल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला.नागरिक पोलिस कर्मचारी विष्णु कुटे यांना धन्यवाद देत आहेत.











































