
देवानंद जाधव
यवतमाळ / अकोला बाजार – पिंपरीबुटी येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य मंगेश जरीले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. येथील प्राथमिक शाळेत संपन्न झालेल्या शिबीरात 35 तरुणांनी रक्तदान केले. यावेळी येथील प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
शिबीरात भाग घेतलेल्या सर्व रक्तदात्यांना मंगेश जरीले यांचे हस्ते बॅग व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यवतमाळ येथील एकनिल ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदात्यांकडुन रक्त गोळा केले. याशिबीराकरीता येथील महेंद्र जरीले , दत्ता सुरपाम, सुरेंद्र ढुमणे, सुरेंद्र भुसारी , जनार्दन ढवस , सुभाष जाधव , विष्णु ढवस , गजानन जकनेवार , श्रीहरी कनाके ,धीरज ठाकुर , प्रफुल्ल येलके , रमन जीभकाटे , कोमल जीभकाटे , सुरेश ताजणे , यश ठाकुर यांनी परिश्रम घेतले. रक्तदान व वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येऊन मंगेश जरीले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.










































