Home विदर्भ भातकुली उत्तमसरा येथे आढळले २२ क्रोबा जातीचे पिल्ले

भातकुली उत्तमसरा येथे आढळले २२ क्रोबा जातीचे पिल्ले

531

प्रतिनिधी : धनराज खर्चान

अमरावती – भातकुली तालुका अंतर्गत येत असलेल्या उत्तमसरा येथे मंगेश सांयके हे कुटुंबासह काही दिवसाकरिता बाहेरगावी गेले होते ते परतल्यानंतर त्यांना घराच्या दाराजवळ सापाची कात आढळली. त्याकडे दुर्लक्ष करीत ते दैनिक कार्यात मग्न झाले सायंकाळी अंथरून टाकत असताना त्यामधून क्रोबा सापाचे पिल्लू बाहेर पडले.मंदा सांयके यांनी तातडीने मुलांना घराबाहेर काढले व वसा संस्थेचे अनिमल्स रेस्कुयर भूषण सांयके याना तातडीने कळविले भूषण सांयके यांनी हा छोटा साप पकडला दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाक करताना तुराटीच्या कुडावर सापाची आणखी दोन पिल्ले दिसली त्यामुळे संपूर्ण कुडच काढण्यात आला.दिवसभराच्या शोधकार्यात क्रोबा सापाचे २२पिल्ले काढून त्यांना जेरबंद केले.भूषण सायंके यांनी या सापाची वनविभागात नोंद केली व पोहरा येथील नैसर्गिक अधीवासात सोडले यावेळी वनविभागाचे कर्मंचारी उपस्थित होते.