Home विदर्भ आवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी

आवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी

277

15 बकऱ्या चोरीला गेल्या , येरला येथील घटना

 प्रमोद झीले येरला (  हिंगणघाट)

वडनेर पो. स्टे. अंतर्गत येत असलेल्या येरला येरला येथे दी.28 च्या मध्यरात्रीच्या सुमारास 15 बकऱ्या चोरी गेल्याची घटना उघडकीस आली. येरला येथील लक्ष्मण दादाजी गाउत्रे यांच्या घरी गोठ्यात बांधून असलेल्या 15 बकऱ्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आली. गोठ्यामध्ये 40 बकऱ्या बांधून होत्या. 15 बकऱ्या चोरी गेल्याने लक्ष्मण गाऊत्रे यांचे अंदाजे 1.50 हजाराचे नुकसान झालेले आहे. या प्रकरणी वडनेर पो.स्टे. गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास वडनेर पो.स्टे.करीत आहे.
गाऊत्रे कुटुंबियांच्या घरून बकऱ्या चोरीला गेल्याने परिसरात दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे.