
इकबाल शेख
वर्धा – फिर्यादी सिद्धार्थ शेषराव देवतळे, रा. आनंद नगर वर्धा यांनी तोंडी रिपोर्ट दिली की, त्यांचा पुतण्या नामे किसन गजानन देवतळे, वय १८ वर्ष याचा दिनांक २७-०७-२०२१ चे रात्र दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा कापून व वजनदार शस्त्राने डोक्यावर आघात करून खून केला. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पो.स्टे. वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेवून सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील अधिकारी व अंमलदार यांचे २ वेगवेगळे पथक तयार केले दरम्यान मिळालेल्या विश्वसनीय गुप्त बातमीवरुन आरोपी शेख अन्वर शेख मेहबूब व ईशाक शहा ख्वाजा शाहा यांनी सदर गुन्हा केल्याचा सुगावा लागल्याने शेख अन्वर शेख मेहबूब यास तळेगाव येथून व ईशाक शहा ख्वाजा शाहा यास एमआयडीसी परिसर वर्धा येथून ताब्यात घेतले. आरोपी १) शेख अन्वर शेख मेहबूब, वय २५ वर्ष राहणार आनंद नगर, वर्धा, २) ईशाक शहा ख्वाजा शाहा, वय २२ वर्ष, रा. चितोडा गेट जवळ, वर्धा यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा हा वैयक्तिक कारणाने संगनमत करून किसन गजानन देवतळे याचा खून केल्याचे कबूल केल्याने सदर आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे ताब्यात देवून सदरचा गुन्हा हा अवघ्या १२ तासातच उघडकीस आणला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक श्री सत्यवीर बंडीवार यांचे निर्देशाप्रमाणे सपोनि श्री महेंद्र इंगळे, पोउपनि. सौरभ घरडे, पोलीस अंमलदार नरेंद्र डहाके, रामकिशन इप्पर, नितीन इटकरे, प्रमोद पिसे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवस्कर, प्रदीप वाघ, पो.हवा .स्वप्निल भारद्वाज, विकास अवचट ,राकेश आष्टणकर, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, यशवंत गोल्हर, अभिजित वाघमारे, मनीष श्रीवास, पवण पन्नासे व सायबर सेल वर्धा यांनी केली.










































