Home विदर्भ भाजप कार्यकर्त्यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना काळे झेंडे दाखवून ताफा अडविण्याचा...

भाजप कार्यकर्त्यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना काळे झेंडे दाखवून ताफा अडविण्याचा केला प्रयत्न

306

प्रतिनिधी –  धनराज खर्चान

अमरावती / भातकुली –  आज दिनांक २५ जुलै २०२१ रोजी माननीय श्री कृषीमंत्री साहेब याचा भातकुली तालुका दौरा आयोजित होता मात्र सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्त्यांनी मात्र त्यांना त्यांचीच गावे दाखवली व बाकी तालुका मात्र तसाच ओसाड पडलेला भातकुली तालुका हा मुळात खारपानपट्टा येथील शेती ही कोरडवाहू आहे त्यामुळे भातकुली तालुका पुर्ण दुष्काळ ग्रस्त घोषीत करावा या मागणीसाठी आम्ही भारतीय जनता पार्टी भातकुली तालुक्यातील सर्व पदाधिकारी माननीय श्री कृषीमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देण्याचे ठरविले होते .मात्र तसे झाले नाही करिता आम्हाला त्यांच्या गाडीचा ताफा नाईलाजाने खोलापुर येथे अडवून त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या या तिन तिघाडी सरकार चा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर केला आहे या वेळी प्रामुख्याने उपस्थित विकास भाऊ देशमुख भातकुली भाजप तालुका अध्यक्ष याच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला भातकुली तालुका भारतीय जनता पार्टीचे योगेश भाऊ उघडे, धनजंय भाऊ ओलिवकर, श्रावण सातव, सवेंद्रभाऊ चक्रे, विवेक रघुवंशी, गजानन भाऊ काळे, उमेश भाऊ झिगंळे सुनील मंजूर, महेंद्र जोंधळे ईत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते