
202 जणांनी घेतली लस
अर्जुन पाडेवार यांचा पुढाकार

जालना- लक्ष्मण बिलोरे
– राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था, ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.१२) शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगरात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. एकूण 202 जणांनी या शिबिरात लस घेतली.
सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अर्जुन पाडेवार यांनी या शिबिरासाठी पुढाकार घेतला.सकाळी 10 वाजता शिबिराचे डॉ.ज्ञानेश्वर नवल यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ नवल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून, तालुका आधिकारी डॉ,जाहेद सय्यद, डॉ,दिपक तारे, राज्य पञकार संघाचे अध्यक्ष बालाजी ढोबळे, पञकार संघ अध्यक्ष शेषराव वायाळ, सामाजिक कार्यकर्ते द ,या, काटे, अाजिसभाई सौदागर, यांची प्रमुख उपस्थितीती होती अलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देऊन पाडेवार यांनी स्वागत केले, या वेळी डॉ.नवल यांनी बोलतांना सांगितले,की कोरोना लस ही सुरक्षित आहे. त्यापासून आरोग्यास कुठलीही हानी होत नाही.असे आपल्या प्रमुख भाषणात सांगितले.त्यानंतर पाहता-पाहता लस घेण्यासाठी एकच गर्दी झाली.सायंकाळपर्यंत एकूण 202 जणांनी लस घेतली. या वेळी महिला यांना खास करून बसण्यासाठी खुर्चाची व्यवस्था करून सावलीसाठी मंडप टाकण्यात आला होता, तसेच सर्व नागरीकांना पिण्याचे पाणी जाग्यावर ऊपलब्ध करून दिले होते,या वेळी आरोग्य कर्मचारी पि, आर, बारटक्के ,संकुतला वंजारे, एस,पी,सांगळे, जे, ऐ, सोळंके,शिक्षक गजानन हांडे, पद्माकर ढवळे, मुश्ताक अन्सारी, पिं, आर, सारस्वत, अंगणवाडी सेविका, सुनिता तिडके, कविता चौधरी, सरस्वती भवर यांनी मोलाची कामगिरी बजावली, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू मुजमुले, करण पाडेवार, राजु पवार, सोनाजी पाडेवार,बबलु मुजमुले, शिवाजी उबाळे, पंकज गुजकर,तुकाराम मुजमुले, गफार सौदागर,याशिन सौदागर,ईसुब सौदागर,अनिकेत बंड, निखिल शिंदे,शैलस अंभुरे,सुनिल पवार, समाधान पाडेवार, भाऊराव उबाळे,दामोधर मुजमुले, आंबेडकर नगरातील सर्व युवकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी वाय, काटे, यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्जुन पाडेवार यांनी मानले,
शहरापासून ग्रामीण रुग्णालय हे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे.सर्वसामान्य माणसाला लस घेण्यासाठी रिक्षाने जाणे आर्थिकदृष्ट्या परडवत नाही.त्यामुळे अनेकजण जाण्याचे टाळतात.ही अडचण लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन केले.शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.
अर्जुन पाडेवार यांनी पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन केले. शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला. लस घेण्याबाबत कुठलाही गैरसमज न करून घेता लस घ्यावी. लस सुरक्षित आहे. – डॉ.ज्ञानेश्वर नवल,परतूर.
कोरोना लसीकरण मोठया प्रमाणात होणे गरजेचे आहे. पाडेवार यांनी पुढाकार घेत या शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. – भाऊसाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी, परतूर.
कोरोना लसीकरण संदर्भात जनजागृती होण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर लस उपलब्ध होण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिराची अत्यंत आवश्यकता असते.अर्जुन पाडेवार यांचे हे कार्य खरोखरच अभिनंदनास पात्र आहे. – राजू मोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी, परतूर.
डॉ.आंबेडकरनगर व परिसरातील अनेक नागरिकांनी अद्याप कोरोनाची एकही लस घेतली नव्हती.हा संपूर्ण परिसर गोरगरीब लोकांचा आहे.घरोघरी जाऊन लोकांना लस सुरक्षित असल्याचे सांगितले तसेच लस घेण्यासाठी त्यांना मानसिकदृष्टया तयार केले. लसीकरण शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. दीड महिन्यानंतर दुसऱ्या लसीसाठी पुन्हा शिबिराचे आयोजन करणार आहे. – आयोजक अर्जुन पाडेवार











































