Home विदर्भ २० ते३० माकड अडकली सांमदा सौंदळी प्रकल्पातील एका चिंचेच्या झाडावर

२० ते३० माकड अडकली सांमदा सौंदळी प्रकल्पातील एका चिंचेच्या झाडावर

438

वन विभाग मात्र झोपलेला ; माहिती देऊनही केले दुर्लक्ष

प्रतिनिधी – धनराज खर्चान
अमरावती – दयार्पुर तालुका दि.१० जुलै दिवशी रात्री सुमारास ढगफुटी झाली.त्यामुळे तालुक्यात हाहाकार मजला संपूर्ण तालुका जलमय झाला. त्यामुळे सांमदा सौंदळी प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठा प्रमाणात वाढ झाली.त्या प्रकल्पामध्ये चिंचेचे झाड आहे .ते चिंचेचे झाड पूर्णपणे पाण्याखाली , त्या वेळेस त्या झाडावर २० ते ३० माकड असल्याचे समजले.११ जुलै पासून ते माकड विना अन्न पाणी झाडावर बसलेले होते.दर्यापूर चे उपविभागीय अधिकारी तसेच दर्यापूर चे तहसीलदार, दर्यापूर चे बळवंत वानखडे यांचे स्विय सहायक (पीए)दीक्षात पाटील यांनी वनविभागाकडे सूचना देऊनही कुणाला १२ तास तर कुणाला २४ तास तर कुणाला ४८ तास उलटून गेले तरी पण कोणीही मदतीला धावून झाले नाही.इतकेच नाही तर पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन देशमुख यांनी फॉरेस्ट ऑफिसर बंड साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे साधून त्यांना माहिती दिली.त्यावर त्याचे उत्तर होते कि रेस्क्यू टीम माकडांचा किंवा वाहनांसाठी येत नाही ती फक्त माणसासाठीच येते.व त्यांनी मोबाईल बंद करून ठेवला दि.१४ जुलै झाडावर मागील ४ दिवसापासून विना अन्न पाणी ती माकड अडकलेली आहेत .आता तरी या झोपलेल्या वनविभागाला जाग येईल का? अशा सवाल तालुक्यातील नागरिक व सांमदा कासीपुर येथील नागरिक करत आहे .