
प्रतिनिधी – धनराज खर्चान
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुका अंतर्गत येत असलेल्या अ ळणगांव उपकेंद्र येथे १ जुलै २०२१ रोजी कोरोना चाचणी होती त्यामध्ये गावातील एका ३५ वर्षीय तरुणांची कोरोना चाचणी पॅजीटीव्ह आली.त्या कोरोना पाजीटीव्ह रुग्णाची आरोग्य उपकेंद्र येथील आरोग्य सेविका आरोग्य सेवक व आशा वर्कस यांनी त्याची साधी विचाररपुस तर केलीच नाही पण त्याला सूचना हि दिल्या नाही आणि एखाद्याला फोन करून सांगितले सुध्या नाही की तू कोरोना पाजीटीव्ह आहे. इतर लोकांच्या सहवासात व घरच्या लोकांच्या दूर राहा ह्या सुध्या सुचना त्या रुग्ण प्रयन्त पोहचल्या नाहीत. हि बाब गावातील सरपंच गौतम भाऊ खंडारे यांच्या लक्षात येताच त्यांनी आरोग्य सेवक याना वारंवार फोन लावला असता ते फोन उचलत नव्हते मग त्या रुग्णाला गावातील समाज मंदिर मध्ये विलगिकरण कक्ष तयार करून दिला. तेथे त्यांची जेवणाची व झोपण्याची सर्व व्यवस्था करून दिली, दुसऱ्या दिवशी सकाळी सरपंच यांनी आरोग्य सेविका यांना फोन लावला असता त्यांनी सरपंच याना सांगितले की आरोग्य सेवक गावामध्ये आले होते व रुगणांची विचारपुस करून गेले पण प्रत्यक्षात ते आले नव्हते मॅडम नि खोटी माहिती सरपंच यांनी दिली आरोग्य कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीचे व खोटारडेपणाचे उत्तर देऊन ते आपल्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयन्त करताना दिसतात.अशा या आरोग्य कर्मचार्याच्या बेजबाबदार व बेशित वागण्यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? असा सवाल सरपंच यांनी उपस्थित केला.अश्या या कर्मच्याऱ्या वर अशी मागणी अळणगांव येथील सरपंच गौतम भाऊ खंडारे केली.










































