Home विदर्भ भातकुली तालुका अंतर्गत येत असलेल्या आष्टी या गावामध्ये”धोंडी धोंडी पाणी दे…..’ म्हणत...

भातकुली तालुका अंतर्गत येत असलेल्या आष्टी या गावामध्ये”धोंडी धोंडी पाणी दे…..’ म्हणत पावसासाठी वरुण राजाला साकडं

547

प्रतिनिधी – धनराज खर्चान

अमरावती – ८ ते १० दिवसापासून पावसाने उघाड दिल्याने पिके सुकत आहेत त्यामुळे पावसासाठी आमच्या आष्टी येथील युवकांनी आज घरोघरी जाऊन धोंडी धोंडी पाणी दे हा गजर केला.पावसा अभावी सोयाबीन,तुर मुंग, कपाशी आदी खरिपातील पिके सुकण्याच्या स्थितीत आहेत.त्यामुळे पाऊस पडावा यासाठी दारोदारी फिरून धोंडी धोंडी पाणी दे…असा गजर करून पाणी अंगावर घेण्याची प्रथा आहे धो धो पाऊस पडावा यासाठी ईश्र्वरला साकडे घातले.गावातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.पाऊस पडण्यासाठी हनुमंता चरणी प्रार्थना केली….

“धोंडी” या प्रथेमधे कमरेला लिंबाचा पाला,खांद्यावर कावड त्याला उलटा लटकवलेला बेडूक आणि वाद्य वाजवणारे काही जण मांगे तसेच काही लोकं पोतं घेऊन धान्य गोळा करण्यासाठी असतात.अशी गावातील मंडळी पाऊस मागण्यासाठी दारोदारी फिरत असतात ते दारात आले की त्यांच्या अंगावर पाणी ओतलं जातं………