Home विदर्भ वीज मंडळाचा मनमानी कारभार आणि ग्राहकांशी उद्धट वागणुकीमुळे लोक संतापले आहे.

वीज मंडळाचा मनमानी कारभार आणि ग्राहकांशी उद्धट वागणुकीमुळे लोक संतापले आहे.

341

रविंद्र साखरे

वर्धा –  पुलगाव येथे ३०/६/३०२१ ला महिला संघटन बांधणी ची मीटिंग होती आणि विज महामंडळाचे काही कर्मचारी वीज कापायला घरी आले .

त्या वेळी मी गावात नव्हतो तेव्हा मी त्यांना फोन वर आजच्या दिवस थांबण्याची विनंती केली.वीज अभियंता गोतमारे साहेब यांना सुद्धा विनंती केली.
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष प्रमोद भोमले यांनी सुद्धा त्यांना विनंती केली परंतु मग्रुरीची भूमिका घेत माझ्या घरची वीज कापण्यात आली .
वास्तविक मी त्यांना आधीच १ तारखे पर्यंत वीज बिल भरतो असे सांगितले होते परंतु आज पैसे नाही भरले तर वीज मंडळ भिकेला लागणार अशा भावनेने त्यांनी वीज कापली.
घरच्या लोकांनी अर्ध्या तासात व्यवस्था करून पैसे भरले परंतु उद्या पावती घेण्यास या असे म्हणून त्यांनी पुढील २ दिवस होऊन सुद्धा ते पैसे वीज मंडळात जमा केले नाही.
म्हणजेच एक दिवस थांबून वीज मंडळ बुडणार न्हवते ना! याचा अर्थ सूडबुद्धीने च ही कारवाई करण्यात आली.
म्हणून वीज अभियंता गोतमारे व वीज कापणी पथकातील उद्धटपणे बोलणारी महिला यांना निलंबित करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी वर्धा, ॲड .बाळासाहेब आंबेडकर,वीज मंत्री, मुख्यमंत्री साहेब व खासदार रामदास जी तडस यांना निवेदन देऊन करीत आहे.
असे अजय रामचंद्र राव घंगारे,
वंचित बहुजन आघाडी वर्धा जिल्हा,वर्धा. यांनी सांगितले