
वाढत्या गर्दीचा परिणाम
अमीन शाह
सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा येथे आज सर्वाधिक १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून चिंतेचे वातावरण पसरले आहे त्यामुळे खबरदारी म्हणून आरोग्य विभागा सह स्थानिक प्रशासनाला तहसीलदार सुनिल सावंत यांनी सुचना दिल्या आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची टेस्ट करण्यात आली यावेळी,रुग्णांच्या हायरिस्क व लो रिस्क मधील नागरीकांचे वर्गीकरण करून आर टी पी सी आर टेस्ट करावी. तहसीलदार सुनील सावंत, गटविकास अधिकारी देवा घुणावत , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र साळवे, सरपंच ज्ञानेश्वर कायंदे , वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोडखे , विस्तार अधिकारी पवार, मंडळ अधिकारी घुगे ,तलाठी गजानन टेकाळे, ग्रामविकास अधिकारी अमोल मेहेत्रे ,वैद्यकीय अधिकारी परमेश्वर चाटे यांच्यासह आरोग्य विभाग, पंचायत विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घरी जावून विचारपूस केली .परंतु पॉझिटिव्ह रुगांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिसत नव्हती .तरी खबरदारी म्हणून पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णांना कोविड सेंटर सिंदखेड राजा येथे पाठविण्यात आले . नागरिकांनी मास्क लावूनच घरा बाहेर पडावे,सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स चे पालन करावे .त्यामुळे नागरीकांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ . कोविड च्या संदर्भात सूचनांचे कडक अंबलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी पंचायत समिती , आरोग्य विभाग , पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वाढत्या गर्दीचा परिणाम ,
सिंदखेडराजा तालुक्यात सर्वच प्रमुख गावात आदेश नसतांनाही आठवडी बाजार भरत आहे भरत असलेल्या आठवडी बाजारात सैकडो लोकांची एकच गर्दी होत असून बाजारात येणाऱ्या लोकांकडून करोना चे कोणतेही निययम पाळल्या जात नसल्याचे दिसत आहे ग्राहक व दुकानदार ही विना मास्क आपला ववयसाय करीत आहे या कडे संबंधित विभाग डोळेझाक करीत असून लोकांची होणारी गर्दी करोना च्या रुग्ण वाढी साठी जवाबदार असल्याचे मत काही जानकार नागरिकांनी वयकत केले आहे ,
गावात भरला होता बाजार ,
आज किंगावराजा येथे 17 रुग्ण सापळले असतांनाही प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे जिल्हाधकारी साहेब यांचे आठवडी बाजार बंद चे आदेश असतांना ही चक्क येथे आठवडी बाजार भरला होता लोकांची बाजारात एकच गर्दी पहायला मिळाली त्या मुळे आश्चर्य वयकत केले जात आहे ,











































