Home विदर्भ सत्याग्रही घाटात ट्रेलर पलटी , “चालक गंभीर जखमी”

सत्याग्रही घाटात ट्रेलर पलटी , “चालक गंभीर जखमी”

698

ईकबाल शेख 

वर्धा / तळेगांव (शा.पं.) :- राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटातील वळणावर शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सत्याग्रहि घाटातील वळनावर नागपुर कडुन अमरावती कडे लोखंडी पत्र्याचे रोल घेवुन जाणारा ट्रेलर क्रं. एम एच ४९- अे टी – ३०९४ अनियंत्रीत होवुन दुभाजक पारकरुन रोडच्या विरुद्ध बाजुला रोडवर पलटी झाला.

या मध्ये ड्रायव्हर दबुन गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती तळेगाव पोलीस स्टेशनला मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होवुन दबुन असलेल्या ड्रायव्हरला काढुन ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे पाठविण्यात आले. वृत्त लिहेस्तोवर जखमीचे नाव कळु शकले नसुन अधिकचा तपास ठानेदार आशिष गजभिये यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक हुसेन शहा, जमादार संजय शिंगने, परवेज खान, पो.शि. सुरज राठोड, राहुल अमोने हे करीत आहे.