
वर्धा -तळेगांव (शा.पं.) : – तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नजीकच्या वर्धमनेरी येथील वर्ध व मनेरी या दोन गावाच्या मध्यभागातुन वाहणार्या नाल्यावरील सिमेंट नी बांधलेल्या कोल्हापुरी बंधार्यावर गुरुवारी (ता. १७) दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान जखमी अवस्थेत एक तरुण मृतावस्थेत पडुन असलेला आढळला गजानन जानरावजी डोमणे वय ४० वर्ष रा. अप्पर वर्धा कालनी च्या मागे वर्धमनेरी
असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी तळेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गजानन डोमने हा सकाळी दहाच्या सुमारास लाकूड आणण्याकरीता गावापासुन काहि अंतरावर नाल्या पलीकडे गेला होता. लाकूड खांद्यावर घेवुन सिमेंट बंधारा वरुन चालत येत असताना शेवाळलेल्या बंधार्यावरुन पाय घसरुन पडल्याने सिमेंट बंधार्याचा डोक्याला जबर मार लागुन डोक्यातुन व कानातुन अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यु होवुन तो बंधार्यावर पडला असलेला दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान शेती कामावरुन परत येत असलेल्या महिलांना दिसला. तेव्हा याची माहिती गावातील पोलीस पाटलांना दिली असता.तेथील पोलीस पाटलानी तळेगाव पोसीस स्टेशनला माहिती दिली. तळेगाव पोलीस स्टेशची चमु घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासनी करीता ग्रामीण रुग्णालय आर्वी येथे पाठविण्यात आला. अधिकचा तपास तळेगाव पोलीस करीत आहे. मृतकाच्या पश्चात वृद्ध आई, पत्नि, एक मुलगा व एक मुलगी असुन त्याच्या अचानक मृत्यने कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.










































