
सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू यांचे पाठ पूराव्या ला तात्काळ यश प्राप्त.

वर्धा जिल्हा आर्वी तालुका सुवर्ण जयंती नगर उत्थान योजने अंतर्गत प्राप्त निधितुन नगर परिषदेने भूमिगत गटार योजनेचे काम सुरु केले.
नियोजन शून्य कामामुळे शहरातील काही प्रभागा मधील रस्ते भूमिगत गटार बनविन्या करीता सम्पूर्णतः खोदकाम करुन ठेवलेले आहे.
पाऊस आल्यामुळे संपूर्ण रस्ते चिखलमय झालेले आहेत.
चिखलमय रसत्यामुळे या होणाऱ्या सम्बन्धित त्रासाला कंटाळून शहरातील स्टेट बैंक कॉलोनी तील व परिसरातील नागरिक संदीप बुधवानी,शेख अंसार, अजय मोटवानी,हिपुल भट्ट,शामू बुधवानी, गोलू मोटवानी,विजय तोलानी,कौस्तुभ पंचकडे यांनी रवीवार दी. १३ में २०२१ ला सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू यांचेशी भेंट घेऊन होत असलेल्या अतोनात त्रासाला आळा घालन्यासाठी तात्काळ काही तरी उपाय योजना करण्यास सांगितले होते.
सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू यांनी तेव्हाच्या तेव्हाच कंट्रातदाराला दूरध्वनि द्वारे संपर्क करुन तत्काळ स्टेट बैंक कॉलोनी मधील रस्ते पूर्वव्रत करण्यास सांगितले होते.
त्यावरून कंट्रातदाराने नेहमी प्रमाणे पुढील ४ ते ५ दिवसात मुरुम टाकून देईल अशे उड़वा उडविचे उत्तर दिले होते.
परंतु सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू यांनी फक्त मुरुम टाकून होणार नाही,थातुर मातुर काम करुन चालणार नाही,कंट्राटातील अटी व शर्थी प्रमाणे संपूर्ण कामे करावीच लागेल आणि जर दोन दिवसात स्टेट बैंक कॉलोनी मधील रसत्यांचे डंबरिकरणाचे काम सुरु झाले नाही तर त्याच चिखलमय रस्त्यावर चिखलात बसून लोकप्रतिनिधि,नगराध्यक्ष, नगरसेवक ,पत्रकार बंधु, सम्बन्धित अधिकारी व शहरातील नागरिक यांना निमंत्रण देऊन सर्वांचे उपस्तिथित “चिखल सभा” घेऊ व कंट्रातदाराला डांबरिकरण व कांक्रीटीकरण सुरु केल्याशिवाय आम्ही चिखलातुन उठु देणार नाही असा इशारा दिला होता.
त्याच वेळेस लगेच कंट्रातदाराने दोन दिवसाचा वेळ मागितला होता व दोंन दिवसाताच डंबरीकरण सुरू करण्याचे आश्वासन सुद्धा सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू यांना दिले होते.
त्या नुसारच स्टेट बैंक कॉलोनी चे डांबरिकरनाचे काम गुरुवार दी १७ में ला सकाळी भूमिपूजन करुन त्याच् वेळेस सुरू करण्यात आले.या वेळेसच या कामाला लागणारे मटेरियल मुरुम,डांबर,बोल्डर,जेसीबी मशीन,ट्रैक्टर, मजूर व इतर साहित्य सह संपूर्ण ताफ़या सह संपूर्ण कामाची सुरुवात सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू यांचे उपस्तिथित करण्यात आली.
या भूमिपूजन व काम सुरू करते वेळी भूमिगत गटार योजनेचे स्टेट बैंक कॉलोनी चे रोड चे पूजन प्रोजेक्ट मैनेजर गुरवे साहेब व कर्मचारी,सुरेश बुधवानी, मनोहर मोटवानी,कैलास मोटवानी, एडवोकेट अवतार गुरुनासिंघानी यांचे हस्ते व शेख अंसार,हिपुल भट्ट, संदीप बुधवानी, गोलू मोटवानी,अभी पंचकडे, प्रवीण पवार,प्रीतम लोखंडे,मोहन छंगाणी,अजय मोटवानी, विजय बुधवानी ,दैनिक साहसिक चे प्रतिनिधि राजू डोंगरे,अशोक किरपाने ,नरेश शंकरपाले,बंडू भूयार इत्यादी नागरिकांच्या उपस्तिथीत करण्यात आली.
भूमिगत गटार योजनेच्या काम मुळे होत असलेल्या त्रासाला कंटाळून शहरातील विविध भागातील नागरिक जेव्हा केव्हाही संपर्क करतात त्याच् क्षणी मी त्या कामाचे पाठपुरावा करुन नागरिकांचे अडचणी दूर करण्याचे प्रयत्न करतो स्टेट बैंक कॉलोनी चे रोड चे डांबरीकरण चे काम सुरु झाल्या मुळे समाधान झालेले आहे- गौरव जाजू (सामाजिक कार्यकर्ता)










































