Home विदर्भ शिवणी प्रा.आ. केंद्राला मिळाली संजीवनी बूटी, डॉक्टर व ग्रामस्थांनी माजी केंद्रीय गृह...

शिवणी प्रा.आ. केंद्राला मिळाली संजीवनी बूटी, डॉक्टर व ग्रामस्थांनी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे मानले आभार

548

यवतमाळ – घाटंजी तालूक्यातील शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्राशी निगडीत असलेले गांव, तांडा, पोंड, वाडी, वस्तीमधे आदिवासी समाज बहुसंख्येने वास्तव्यास असून या परिसरातील जनतेसाठी शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, संजीवन दायी ठरत आहे,

परंतु नेहमीच दुर्लक्षीत असलेल्या शिवणी प्रा.आरोग्य केंद्राला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री मा.हंसराजजी अहीर साहेब यांनी लॉकडाउन असतांनी जिल्हा जनसंपर्क दौर्यात येथे भेट दिली, येथील डॉक्टर व कार्यकर्ता सोबतच्या बैठकीत कोरोनावायरस तिसर्या लाटेच्या पुर्व तयारी बाबत चर्चा केले, त्याप्रसंगी, जिल्हा भाजपा व्हीजेएनटी. आघाडी चे जिल्हाअध्यक्ष मोहण जाधव यांनी शिवणी प्रा.आ.केंद्राला ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन (प्राणवायु संयंत्राची) मागणी केली असतांनी, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री मा.हंसराजीजी अहीर साहेबांनी ग्रामिण भागातील जनतेसाठी प्राणवायु संयंत्र देण्याचे माण्य केले, ऐवढेच नव्हे तर या मागणीची तात्काळ दखल घेवून एक आठवड्याचे आत प्राणवायु संयंत्र पाठविले, ग्रामपंचायत शिवणी येथे कार्यक्रमाचे आयोजन करून प्रा.आ.केंद्राचे डॉ.कपील शर्मा, श्री वाहीकर, कर्मचारी स्टाप यांना निमंत्रित करून ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन (प्राणवायु संयंत्र) सुपुर्द करण्यात आले, याप्रसंगी भाजपा व्हीजेएनटी आघडीचे जिल्हाध्यक्ष मोहण जाधव, यांचे हस्ते उपसरपंच नरेन्द्र चव्हाण, डॉ.सुरेश पवार, अतिशजी देशमुख शिवणीकर, गोपीचंद पवार, विलास पवार यांच्या प्रमुख उपस्थितित प्राणवायु संयंत्र सुपुर्द केले, तसेच कोरोना वैच्छिक महामारी नियंत्रीत करण्यासाठी ग्रामस्थ व तरूणांनी पुढे येवून लसीकरण करून घ्यावे, हेच कोरोनावर प्रभावी उपाय असल्याचे मार्गदर्शन मोहण जाधव यांनी केले, प्रा.आ.केंद्राचे सर्व कर्मचारी, ग्रामस्त, यांनी माजी मंत्री हंसराजजी अहीर साहेबांचे आभार मानले.