
रावेर (शरीफ शेख)
रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, रा. कॉ. शहराध्यक्ष मेहमूद शेख व रा.यु.कॉ. शहराध्यक्ष प्रणित महाजन यांचे नेतृत्वात व रा.यु.कॉ. जळगांव जिल्हाउपाध्यक्ष योगेश पाटील, पदवीधर शहराध्यक्ष विवेक पाटील तथा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उपस्थितीत मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांचे विषयी व्यक्तिशः टीका करणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासंदर्भात रावेर तहसीलला नायब तहसिलदार जी.एल. शेलकर साहेब, व रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांचेकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,
राष्ट्रवादीचे तथा ओबीसी समाजाचे जेष्ठ लोकनेते मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याविषयी व्यक्तिशः टीका करणाऱ्या भाजपच्या प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे जाहीर निषेध करण्यात आले,
सद्यस्थितीत राज्याला सहकार्याची गरज असताना विरोधी पक्ष टीका करण्यात मग्न आहे, हे निषेधार्थ आहे.
मा.ना.श्री. छगन भुजबळ साहेब हे महाराष्ट्र राज्य शासनात अन्न व पुरवठा मंत्री आहे. त्यांनी पश्चिम बंगाल मधील झालेल्या निवडणुकीत विजय झाल्या बद्दल अभिनंदन केले असता भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील जाहीर मिडिया समोर तुम्ही जामिनावर आहे. तुम्हाला बघून घेऊ. असे म्हणत हा न्यायालयाच अपमान करित आहे. आणि उघड .
उघड धमकी देत आहे. भुजबळ साहेबांचे काही बरेवाईट झाल्यास चंद्रकांत पाटील जबाबदार राहतील व त्याच्यावर योग्य ती. कार्यवाही करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. जर कुणी जाणीवपूर्वक टिका करत असेल तर त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी. असे निवेदनात विनंती.











































