Home विदर्भ दिव्यांग व्यक्तींना कोविड लसीकरण केंद्रावर त्वरित लस उपलब्ध करून द्या – ललित...

दिव्यांग व्यक्तींना कोविड लसीकरण केंद्रावर त्वरित लस उपलब्ध करून द्या – ललित जैन

346
विनोद पञे
यवतमाळ – महाराष्ट्रात १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांसाठी कोविड लसीकरण मोहिम महाराष्ट्र सरकारने राबवली असून यासाठी कोविन अँप किंवा पोर्टलवर जावून नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. पण यवतमाळ शहरात काही लसीकरण केंद्रावर असे निदर्शनास आले आहे की दिव्यांग व्यक्तीकडे अँन्ड्राईड मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कोविड लसीकरणासाठी नोंदणी करणे त्रासदायक झाले आहे. त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावरून लस न घेता निराशेने परतावे लागत आहे. कोणताही दिव्यांग नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये या करिता जिल्हातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिव्यांग व्यक्तीचा फक्त मोबाईल नंबर व ओळख – पत्राव्दारे नोंदणी करून त्याच दिवशी लगेच लसीकरणाची सुविधा दिव्यांग नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात यावी या करीता ‌मा. श्री.अमोल येडगे जिल्हाधिकारी यवतमाळ यांना युवक कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटनिस ललित जैन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले