
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील मुर्ती येथील रहिवाशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते भागवत सोळंके यांचा सागर सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी श्री. पडवळ साहेब यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष भागवत आन्ना सोऴंके यांचा सागर सह.साखर कारखान्यावर एका छोटेखानी कार्यक्रमात शाल ,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करन्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील कर्मचारी, शेतकरी कामगार उपस्थित होते.भागवत सोळंके यांची संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष पदी निवड होताच घनसावंगी तालुक्यातील , विशेषतः कुंभार पिंपळगाव सर्कल मधील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.सोळंके यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडो गोरगरिब गरजवंतांना , निराधारांना शासनाच्या योजनांचा निश्चितच फायदा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.











































