Home जळगाव पाल वृन्दावन धाम आश्रमातील पुलाचे काम संतगतीने

पाल वृन्दावन धाम आश्रमातील पुलाचे काम संतगतीने

200

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील पाल येथील परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धाम पाल आश्रमातील सत्संग पांडाल ते पूज्य बापूजी समाधि हरिधाम मंदिराला जोड़णारा पर्यटन विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या पुलाचे बांधकाम हे मागील वर्षापासून संतगतीने सुरु असून गेल्या वर्षभरापासुन काम अपूर्ण अवस्थेत दिसत आहे.या आश्रमात दरवर्षी गुरुपौर्णिमा महोत्सव , होळी शिबिर, पूज्य बापूजी समाधि दिनानिमित्त देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी व सत्संग अमृताचा लाभ घेण्याकरिता येतात आणि भाविकाना सत्संग पांडाल ते समाधि दर्शना साठी जोडणारा पुल जीर्ण व अरुन्द असल्याने भविकासाठी धोकादायक ठरत होता म्हणून आश्रमातर्फे नवीन पुलाची मागणी करण्यात आली होती .
गेल्या दोन वर्षापूर्वी माजी आमदार कै. हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नाने पर्यटन विकास योजने अंतर्गत परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रमातील पुलाचे बांधकाम एक कोटिचे मंजूर करण्यात आले होते .या कामाचे उद्घाटन माजी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते झाले होते . या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि . प सदस्य नंदाताई पाटिल, पी के महाजन, सुरेश धनके, माधुरी नेमाड़े, धनश्री सावाले, मिलिंद वायकोले, पद्माकर महाजन, यांच्या उपस्थितित उद्घाटन सोहळा सम्पन्न झाला होता. तेव्हापासून गेल्या वर्षभरापासुन या पुलाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असून आजपावेतो फक्त एका गाळ्यापर्यन्त स्लैप लेवल करण्यात आलेली असून उर्वरित चार गाले हे स्लाप अभावि अपूर्ण अवस्थेत असून हे काम अद्याप ही रखडलेले आहे तरी या कामाकडे प्रशासनाने लक्ष देऊन या पुलाचे अपूर्ण अवस्थेतील बाधकाम लवकरात लवकर पूर्ण करुन मिळावे अशी मागणी ग्रामस्तासह चैतन्य साधक परिवारातर्फे करण्यात येत आहे.