
जालना- लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील श्रीपत धामणगाव शिवारात या वर्षी शेतकऱ्यांनी सुर्यफुलाची पेरणी आणि लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. घनसावंगी तालुक्यात सुर्यफुलाचे पिक नामशेष झाले होते.सुर्यफुलाचे पिक परवडत नाही,शेतीचा कस कमी होतो…असे अनेक कारणं सांगून शेतकरी सुर्यफुलाचे पिक घेण्याचे टाळत होते.परंतु या वर्षी श्रीपत धामणगावच्या शेतकऱ्यांना साक्षात्कार झाला.येथील मा.सरपंच लालासाहेब शिंदे यांनी सांगितले की खाद्य तेलाचे भाव प्रचंड वाढले आहेत, त्यामुळे सुर्यफुलाचे भावही वाढले आहेत.बाजारात सुर्यफुलाचे नवनवीन वाण आले आहेत.प्रगतशील शेतकरी यांनी ही सात एकर सुर्यफुल पेरले आहे गावातील दहा ते बारा शेतकऱ्यांनी सुर्यफुलाची पेरणी केली आहे यामुळे संपूर्ण शिवार पिवळेधमक दिसत आहे.पिवळा पितांबर नेसलेल्या कृष्णा प्रमाणे निसर्ग नटला आहे ..असा भास होतो आहे.अधुनमधून अकाली पावसाच्या सरी पडत असल्याने त्यामुळे उशिरा घेतलेले ज्वारीचे,गव्हाचे,उन्हाळी बाजरीचे पीक टवकारले आहे.काढणीस आलेले गहु, हरभरा, फळबाग शेतकरी अवकाळी पावसाच्या भितीने धास्तावले आहेत.
हे पण वाचा
शनिवारी रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.सायंकाळी जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू झाला . मेघगर्जनेसह पाऊस झाला.भोकरदन , जाफराबाद,सह काही भागात गारांचा पाऊस, पडत होता.यामुळे शाळू ज्वारी, गहू,उन्हाळी बाजरी,आंबा,द्रांक्ष बागा, आदी पिकांना अवकाळीचा फटका बसणार आहे.शनिवारी ,२० फेब्रुवारी रोजी रात्रभर पाऊस पडत होता, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विजपुरवठा खंडित झाल्याने धांदल उडाली होती.











































