
मुंबई (सुरेश वाघमारे )
*टाईम्स मॅगॅझीन ने जाहीर केलेल्या जागतिक उभरत्या शंभर नेत्यांच्या यादीत “आजाद समाज पार्टी चे” राष्ट्रीय अध्यक्ष “मा.अॅड.भाई चंद्रशेखर आजादजी” यांचे नाव आल्याने खवळलेल्या* *#जातीयवादी zeenews ने आझाद भाईंचा फोटो दाखवत आपण यांना ओळखता का ? म्हणून आपल्या काही चिंधी पत्रकांरांकरवे एक न्युज चालवली. ही मा.चंद्रशेखर आझाद यांची बदनामीच होय.

*जागतिक स्तरावर एखाद्या भारतीय नेत्याची ओळख होणे ही खरंतर गर्वाची बाब पण केवळ तो नेता मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून त्यांची अशी बदनामी करण्याची घाई “झी न्यूज चॅनल” ने केली आणि वैश्विक स्तरावर भारतीय मिडिया ही किती खालच्या स्तरावर उतरू शकते याचं प्रदर्शन मांडले. एकप्रकारे भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न या चॅनल ने केला.*
*या यादीत इतरही काही भारतीय वंशाच्या नेत्यांची नावे जाहीर झाली परंतु केवळ ते उच्चवर्णीय होते म्हणून त्यांच्या विरोधात “आपण यांना ओळखता का” असं कॅम्पेन चालवावंसं झी न्यूज ला वाटलं नाही. मग सरळसरळ* *जातीयवादी चेहरा घेऊन जर झी न्यूज समोर येत असेल तर आझाद समाज पार्टी ही या जातीवादी मिडियाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.*
*झी न्यूज चॅनल च्या लोअर परेल येथील कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकार्याला जाब विचारत आझाद समाज पार्टीच्या*
*महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा (महिला आघाडी) आदरणीय नेहाताई शिंदे*
*आजाद समाज पार्टी चे महाराष्ट्र महासचिव* *मा.कैलास जैस्वारजी, यांच्या नेततृत्वाखाली* *व मा.राहुल दादा प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली*
*महाराष्ट्र प्रदेश संघटक (महिला आघाडी)*
*आयु.दर्शनाताई जाधव*
*महाराष्ट्र प्रदेश सचिव (महिला आघाडी)* *आयु.वृषालीताई कांबळे तसेच*
*मुंबई प्रदेश संघटक आयु.विकी शिंगारे, मुंबई प्रदेश,महासचिव*
*आयु.अतुल खरात,*
*वरीष्ठ कार्यकर्ते आयु.सुदेश शिंदे सर*
*#घाटकोपर (पश्चिम) तालुकाध्यक्ष-* *आयु.नरेंद्र शिरसाट* *#घाटकोपर(पुर्व)_ तालुकाध्यक्ष-* *आयु.नितीन जाधव,*
*नितीन पायाळ, योगेश अहिरे इत्यादी पदाधिकार्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी कार्यालयाला धडक मोर्चा नेत दोन दिवसांचा अवधी दिला आहे. दोन दिवसांमध्ये जर “Zee News Chanel” ने जाहीरपणे माफी मागितली नाही तर, संपूर्ण भारतभर त्यांच्या कार्यालयांवर आझाद समाज पार्टी चे कार्यकर्ते हे हल्लाबोल करतील आणि आक्रमक आंदोलन करतील असा निर्वाणीचा इशारा त्यांना दिलेला आहे.
*यावेळी झी न्यूज चॅनल तर्फे त्यांचे अधीकारी (Administrative Manager) #रामदास_ससाणे यांनी दोन दिवसांमध्ये माफीनामा जाहीर करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.*











































