Home विदर्भ यवतमाळ नगर परिषद संकुलातील रुग्णालास अचानक लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

यवतमाळ नगर परिषद संकुलातील रुग्णालास अचानक लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

282

यवतमाळ – यवतमाळ शहराच्या मध्य वस्तीतील दत्त चौक भाजी मार्केट लगत येथील रुग्णालय असून या रुग्णालयात अचानक आग लागल्यामुळे या ठिकाणी आयुष्य इलेक्ट्रो होमिओपॅथी सेंटर मधील अनेक मशीन उपचारास ठेवण्यात आल्या – होत्या यात असलेल्या अनेक मशनरी जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी २:०० वाजताच्या दरम्यान घडली डॉक्टर ममता बैस यांचे हे रुग्णालय असून या रुग्णालयात आयुष इलेक्ट्रो होमिओ सेंटर चालवत होत्या त्या ठिकाणी जिम मशनरी – व रुग्णालयाचे मूळ कागदपत्र होते असे ही बोलल्या जात आहे . या लागलेल्या आगीत सर्वच जळून खाक झाले असा प्राथमिक अंदाजावरून जवळपास ८ ते १० लाखाचे नुकसान झाले असावे . तसेच यावेळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी दोन तासातच आग आटोक्यात आणली